शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बहिण संत मुक्ताबाईला बंधू ज्ञानोबारायांकडून साडीचोळी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 19:08 IST

पंढरपूर येथील मुक्ताईच्या मठात गुरूवारी बहिण संत मुक्ताबाईला बंधू ज्ञानोबारायांकडून साडू चोळी भेट देण्यात आली. या सोहळा डोळ्यात साठविण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते.

ठळक मुद्देआळंदी देवस्थान कमिटीचे विश्वस्त अजित कुळकर्णी यांच्याहस्ते अहेर अर्पणशेकडो भाविकांनी डोळ्यात साठविला सुखसोहळामुक्ताई पालखी सोहळ्याचे आज परतीसाठी प्रस्थान

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर, दि.२६ : संत मुक्ताबाईस बंधू ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून साडीचोळी भेटीचा सोहळा गुरूवारी पंढरपूर येथील मुक्ताबाई मठात पार पडला. आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. अजित कुळकर्णी यांच्या हस्ते साडी चोळी अर्पण करण्यात आली. या सोहळ्याला उपस्थित शेकडो भाविक आनंद व भक्तीचा हा सुखद क्षण डोळ्यात साठवितांना भावविभोर झाले होते.आषाढी वारीत संत परंपरेनुसार दोघा भावंडाची भेट वाखरी (पंढरपूरजवळ) येथे होत असते. तथापि दिवसेंदिवस वाढत जाणारी सोहळ्यातील गर्दी लक्षात घेवून दोघा भावंडाची केवळ धावती भेट होत होती. त्यामुळे अलीकडे आषाढ शु. चतुर्दशीला पंढरपूर येथील मुक्ताबाई मठात श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे बहीण मुक्ताबाईची महापूजा करून साडीचोळी अर्पण करण्यात येते. गुरूवारी प्रमुख विश्वस्त ह.भ.प.अजित कुळकर्णी यांनी मंत्रोच्चारात पंचामृत अभिषेक महापूजन करून साडीचोळी अर्पण केली.ज्ञानोबादादाकडून बहीण मुक्ताबाईस साडीचोळी प्रदान केल्या जाण्याच्या भावपूर्ण सोहळ्याला उपस्थित भाविक हा सोहळा पाहून कृतकृत्य झाले. यावेळी मुक्ताबाई संस्थान कोथळी ता. मुक्ताईनगर येथील विश्वस्त पंजाबराव पाटील, शंकरराव संबारे पाटील, अजबराव पाटील, अशोकराव पवार, जयवंतराव महल्ले, राजू पाटील , पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे, सुधाकर पाटील, उध्दव जुनारे, ज्ञानेश्वर हरणे, शशी पाटील, मुक्ताबाई फडावरील कीर्तनकार , टाळकरी महाराज मंडळी, वारकरी आणि भाविक भक्त व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.