शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

बहिणाबार्इंच्या कवितेतील आखजी (आखाजी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 17:50 IST

भुसावळ येथील मराठी साहित्याच्या अभ्यासक आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या विविध भूमिका, वेशभूषा साकारलेल्या प्रा.कमल पाटील यांनी बहिणाबार्इंच्या कवितेतील आखाजी वर्णन केली आहे. वाचा ती त्यांच्याच शब्दात...

आखजीचा आखजीचा मोलाचा सन देखाजी निंबावरी निंबावरी बांधलाय छान झोका जी ।असं म्हणून आमच्या बहिणाई या मोलाच्या सणाचे मौलिकत्व अतिशय मार्मिक, चपखल आणि गोड शब्दात गुंफत जातात. खरंच आमचे सण, उत्सव मानवी जीवन सर्वार्थाने सुखी करणारे आहेत. फक्त आम्ही त्यामागची वैचारिक, तात्त्विक बैठक समजून घेणे आवश्यक आहे. संसार तापाने तापलेल्या, त्रासलेल्या जीवाला सुखाची, आनंदाची, चैतन्याची नवसंजीवनी देणारे हे सण आहेत. बरेच सण स्त्रियांना आगळ्या वेगळ्या सुखाची अनुभूती देणारे आहेत. आमचा आखजीचा सण सासुरवाशीणीला कशी सुखाची अनुभूती देतो याचे सुंदर वर्णन आमच्या बहिणाबाई चौधरींनी त्यांच्या ‘आखजी’ कवितेत केले आहे. बहिणाबार्इंनी गुढीपाडवा, आखजी, पोळा या खान्देशातील कृषी संस्कृतीत महत्त्वाचे स्थान असलेल्या सणांचे सुंदर चित्रण केले आहे.खान्देशात साजरा होणारा ‘आखजी’ हा सण, या सणाचे त्या काळातील स्वरूप, महत्त्व कवयित्री बहिणाबाई चौधरी अतिशय रसाळ शब्दात सांगतात. बहिणाबार्इंच्या काळात १०, १२ वर्षाच्या मुलींचे विवाह होऊन त्या एकत्र कुटुंबात नांदायला जात. या एकत्र कुटुंबात काम आणि सासुरवास हेच या मुलींच्या वाट्याला यायचे. या त्रासात त्यांना माहेरची आस लागायची. या मुलींना सुखाचे, आनंदाचे क्षण अनुभवायला मिळायचे ते सणाला माहेरपणासाठी गेल्यावर. त्यातही आखजीचा आनंद काय सांगावा -माझा झोका माझा झोकाचालला भिरीभिरी जी ।माझा झोका माझा झोकाखेयतो वाऱ्यावरी जी ।असा झोका, गाणे यांचा अपूर्व आनंद त्या लुटतात. या झोक्याच्या वर्णनाच्या ओघात सासुरवाशीणीच्या मनाची आंदोलनेही आमच्या बहिणाई अगदी हळूवारपणे टिपतात.गेला झोका गेला झोकाचालला माहेराले जी ।आला झोेका आला झोकापलट सासरले जी ।असे स्त्री मनाचे हेलकावे त्या सहज टिपतात. ‘आखजीला’ झोक्याच्या आनंदाबरोबर अनेक गोष्टींचा आनंद त्या घेतात. त्यात गवराईचे खेळही महत्त्वाचे आहेत.आमच्या खान्देशात आखजीची चाहुल चैत्राच्या सुरुवातीपासूनच लागते. लहान मुली चैत्र महिन्यात गवराई बसवतात. त्या सुंदर सजवतात म्हणूनच - गवराई गवराईसजव सजवल्या जीअशा सुंदर सजवलेल्या गवराईजवळ गाणे खेळ यासाठी ‘संगावीनी’ बोलवतात. गाण्यांबरोबर पिंगा, फुगडी, टिपºया अशा कितीतरी खेळांचा ‘धांगडधिंगा’ चालतो, एक वेगळा आनंदोत्सव या गवराईचे ‘आखजीला थाटात विसर्जन होते.किती खेय, किती खेय,सांगू मी काय काय जीखेयीसनी खेयीसनीआंबले हातपायजीअशा खेळून थकलेल्या या मुली दोन दिवस विसावा घेतात आणि ‘सन सरे आस उरे’ असे म्हणून आता परत आखजी केव्हा येणार, असे ‘सईला’ विचारुन संसाराला लागतात, असे सुंदर वर्णन आखजीचे माझ्या बहिणाई करतात. लेवागण बोलीमुळे काव्य अधिकच रसाळ होते. याशिवाय या सणाला अनेक पैलू आहेत. पौराणिक महत्त्व या सणाचे आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला हा सण खरंच मोलाचा नाही का?-प्रा.कमल पाटील, भुसावळ

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ