जळगाव - यंदा महापौरपद हे ओबीसी महिला राखीव आहे. भाजपाकडून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे, भारती सोनवणे, सिंधुताई कोल्हे यांनातर शिवसेनेकडून माजी उपहामौर सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन व हेमलता डी.वाणी यांना महापौर पदाची संधी आहे.प्रभागनिहाय आरक्षणामध्ये १० जागा या ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहेत. मात्र, ओबीसी प्रमाणपत्र असलेल्या महिला उमेदवाराने खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला असला तरी त्यांनाही महपौरपदाची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ओबीसी महिला राखीव असलेल्या १० जागांसह इतर महिला राखीव जागांच्या लढतींवर महापौरपदाचे भवितव्य अवलबंून राहणार आहे.शिवसेनेकडून तीन ते चार उमेदवार आघाडीवरओबीसी महिला राखीव प्रवर्गात संगिता दांडेकर, ममता कोल्हे, माजी महापौर जयश्री धांडे, भारती जाधव, हेलमता डी.वाणी, भावना पाटील, हर्षाली वराडे, वंदना भोसले, कामिनी महाजन, सुचिता महाजन यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर जयश्री महाजन यांनी देखील खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महापौरपदासाठी शिवसेनेकडून जयश्री महाजन, हेमलता डी.वाणी, जयश्री धांडे यांना महापौरपदाची संधी आहे. जयश्री धांडे यांनी याआधीही महापौरपद भूषविले आहे. त्यांनी प्रभाग ४ ब मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यांचा विरोधात भाजपाच्या भारती सोनवणे यांचे आव्हान राहणार आहे.आमदार पत्नी सीमा भोळे यांनाही संधीभाजपाकडून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी व विद्यमान नगरसेविका सीमा भोळे यांचे नाव पुढे येत आहे. त्या दृष्टीनेच त्यांनी ओबीसी महिला राखीव प्रभाग ७ अ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेच्या हेमलता डी.वाणी यांचे तगडे आव्हान आहे. तर खाविआमधून भाजपामध्ये गेलेल्या माजी उपमहापौर भारती सोनवणे यांनी देखील ओबीसी महिला राखीव प्रभाग ४ ब मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्यासह सिंधुताई कोल्हे यांना देखील महापौरपदाची संधी भाजपाकडून आहे. त्यामुळे भाजपाची सत्ता आल्यास महापौरपदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.ओबीसी महिला राखीव प्रभागमहिला राखीव (१० जागा) - प्रभाग १ - ब, प्रभाग ३-क, प्रभाग ४-ब, प्रभाग ६-ब, प्रभाग ७-अ, प्रभाग १०-ब,प्रभाग ११-ब, प्रभाग १३- ब, प्रभाग १४ - अ, प्रभाग १७-अ
जळगावात सीमा भोळे, जयश्री महाजन यांना महापौरपदाची संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 21:24 IST
यंदा महापौरपद हे ओबीसी महिला राखीव आहे. भाजपाकडून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे, भारती सोनवणे, सिंधुताई कोल्हे यांनातर शिवसेनेकडून माजी उपहामौर सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन व हेमलता डी.वाणी यांना महापौर पदाची संधी आहे.
जळगावात सीमा भोळे, जयश्री महाजन यांना महापौरपदाची संधी
ठळक मुद्देनिवडणुकीत १० जागा ओबीसी महिलेसाठी आरक्षितशिवसेनेकडून तीन ते चार उमेदवार आघाडीवरआमदार पत्नी सीमा भोळे यांनाही महापौरपदाची संधी