शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभरात चांदीच्या भावात दोन हजारांची घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:11 IST

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच आहे. आठवडाभरात चांदीचे दोन हजार रुपये प्रतिकिलोने, तर सोन्याचे ...

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच आहे. आठवडाभरात चांदीचे दोन हजार रुपये प्रतिकिलोने, तर सोन्याचे भाव एक हजार २०० रुपये प्रतितोळ्याने घसरले आहे. त्यामुळे शुक्रवारी चांदी ७१ हजार ५०० रुपये प्रतिकिलो तर सोने ४८ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. डॉलरचे दर कमी-कमी होत असल्याने सोने-चांदीच्या भावात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोना संसर्गामुळे निर्बंध काळात सोने-चांदीचे भाव चांगलेच वाढत गेले. अनलॉक होऊन सुवर्णपेढ्या सुरू झाल्या. त्यानंतर तीन ते चार दिवस सोने-चांदीत चांगलीच भाववाढ होत गेली. त्यामुळे १० जून रोजी चांदी ७४ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली होती, तर सोने ५० हजार रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर मात्र घसरण सुरू झाली. आठवडाभराची स्थिती पाहता ११ जून रोजी ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर असलेली चांदी १८ रोजी ७१ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. तसेच ११ जून रोजी ४९ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर असलेले सोने १८ रोजी ४८ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले आहे.

डॉलरच्या दराचा परिणाम

गेल्या आठवडाभरापासून अमेरिकन डॉलरचे दर कमी कमी होऊन भारतीय रुपया मजबूत होत आहे. त्यामुळे सोने-चांदीचेही भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. ७४ रुपयांच्या पुढे गेलेले डॉलरचे दर शुक्रवारी (दि. १८) ७३.९६ रुपयांवर आले.

आठवडाभरातील घसरण

दिनांक-सोने-चांदी

११ जून-४९,७००-७३,५००

१४ जून-४९,४००-७३,०००

१५ जून-४९,१००-७२,५००

१६ जून-४८७५०-७२,०००

१७ जून-४८,५००-७१,५००

१८ जून-४८,५००-७१,५००