शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 12:33 IST

चीनमधील ‘कोरोना‘मुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटली

जळगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी वाढल्याने सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या भाववाढीस लगाम बसू लागला असून चांदीच्या भावात एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरण होऊन ती ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आली आहे. सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार सुरू असून चे ४०, ८०० ते ४१, १०० या दरम्यान खालीवर होत आहेतआंतरराष्ट्रीय पातळीवर इराण व अमेरिका यांच्यातील तणावाच्या स्थितीमुळे गेल्या काही दिवसात सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ होत गेली. मात्र त्यांच्यातील तणाव कमी झाल्यानंतर सोन्या-चांदीचे भाव स्थिर झाले. त्यानंतर आता चीनमध्ये कोरोनो व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चांदीची मागणी घटली आहे.औद्योगिक मागणी घटलीसध्या लग्न सराई असली तरी चांदीची मागणी कमी होत आहे. सोबतच औद्योगिक मागणीदेखील कमी झाल्याने मोठ्या व्यापारी व उद्योजकांनी चांदी खरेदीत हात आखडता घेतला आहे. त्यामुळे वरील दोन्ही कारणांनी मागणी कमी होत असल्यानेही चांदीचे भाव कमी होत असल्याचे सांगितले जात आहे.या सर्वांचा परिणाम होत असल्याने चांदीचे भाव १३ रोजी एकाच दिवसात एक हजार रुपयांनी घसरून ते ४७ हजार रुपये प्रती किलोवरून ४६ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत. १४ रोजीदेखील ते ४६ हजार रुपयांवर कायम होते.सोन्यात चढ-उतारगेल्या काही दिवसात सोन्याने ४२ हजाराच्या पुढे झेप घेतली होती. मात्र जानेवारी अखेरपासून सोन्याच्या भाववाढीला ब्रेक लागला. तेव्हापासून त्यात २०० ते ३०० रुपये प्रती तोळ््याने चढ-उतार होत आहे. गेल्या आठवड्यात ५ फेब्रुवारी रोजी ४० हजार ८०० रुपयांवर असलेले सोने वाढत जाऊन १० रोजी ४१ हजार १५० रुपये प्रती तोळ््यावर पोहचले. दुसऱ्याच दिवशी ११ रोजी त्यात २५० रुपयांनी घसरण होऊन ते ४० हजार ९०० रुपयांवर आले. १३ रोजी पुन्हा हे भाव ४१ हजारावर तर १४ रोजी ४१ हजार १०० रुपयांवर पोहचले आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी घटण्यासह औद्योगिक मागणी घटल्याने चांदीच्या भावात घसरण होत आहे. सोन्यातही चढ-उतार होत आहे.- अजयकुमार ललवाणी,अध्यक्ष,जळगाव शहर सराफ असोसिएशन.

टॅग्स :Jalgaonजळगाव