शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चांदी पुन्हा दीड हजार रुपयांनी गडगडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:40 IST

जळगाव : दोन दिवसांपूर्वी पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात सोमवार, ११ जानेवारी रोजी पुन्हा एक हजार ...

जळगाव : दोन दिवसांपूर्वी पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झालेल्या चांदीच्या भावात सोमवार, ११ जानेवारी रोजी पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ६३ हजार रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले. कोरोना लसचा ड्राय रन झाल्यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरणाच्या हालचाली सुरू असल्याने त्याचा परिणाम सोने-चांदीच्या भावावर होत असल्याचे सांगितले जात आहे.

गेल्या आठवड्यात सोमवार, ४ जानेवारीपासून दोन दिवस चांदीच्या भावात वाढ झाली. मात्र त्यानंतर ते भाव पुन्हा कमी-कमी होत गेले व शनिवार, ९ जानेवारी रोजी तर एकाच दिवसात चांदीच्या भावात पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सुवर्ण बाजार उघडताच चांदीच्या भावात पुन्हा एक हजार ५०० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव ६४ हजार ५०० रुपयांवरून ६३ हजार रुपये प्रति किलोवर आले. अशाच प्रकारे सोन्याच्याही भावात शनिवारी एक हजार रुपयांनी घसरण झाली होती. त्यानंतर सोमवार, ११ जानेवारी रोजी त्यात पुन्हा ५०० रुपयांनी घसरण होऊन ते ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

पाच दिवसात ८५०० रुपयांनी घसरली चांदी

गेल्या पाच दिवसातील स्थिती पाहता चांदीचे भाव तब्बल आठ हजार ५०० रुपयांनी घसरले आहेत. ६ जानेवारी रोजी ७१ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात ७ रोजी एक हजार २०० रुपयांनी घसरण होऊन चांदी ७० हजार ३०० रुपयांवर आली होती. त्यानंतर ८ रोजी हे भाव कायम राहिले व ९ रोजी थेट पाच हजार ८०० रुपयांनी घसरण झाली आणि चांदी ६४ हजार ५०० रुपयांवर आली होती. आता पुन्हा सोमवारी एक हजार ५०० रुपयांनी घसरण झाली व चांदी ६३ हजार रुपयांवर आली. अशाच प्रकारे पाच दिवसात सोन्याचे भाव दोन हजार ३०० रुपयांनी घसरले. ६ रोजी ५२ हजार ४०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ७ रोजी ८०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार ६०० रुपयांवर आले. ८ रोजी तेच भाव कायम राहून ९ रोजी एक हजार रुपयांनी घसरण झाली होती. सोमवारी पुन्हा ५०० रुपयांनी घसरण होऊन सोने ५० हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले.