जळगाव : आठवड्याच्या सुरुवातीपासून स्थिर असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजी ५०० रुपयांची घसरण होऊन ती ६४ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. सोन्याच्याही भावात ३०० रुपयांनी घसरण होऊन ते ४८ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. आठवडाभरानंतर गेल्या शुक्रवारप्रमाणेच चांदी ६५ हजारांच्या खाली आहे.
या आठवड्याला सुरुवात झाल्यापासून चांदीचे भाव ६५ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर होते. सोन्यात केवळ मंगळवारी १०० रुपयांची घसरण झाली व ते ४८ हजार ४०० रुपयांवर आले होते. तेव्हापासून ते याच भावावर स्थिर होते. मात्र शुक्रवारी त्यात ३०० रुपयांची घसरण झाली व ते ४८ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर आले. अशाच प्रकारे चांदीतही शुक्रवारी ५०० रुपयांची घसरण झाली व ती पुन्हा ६४ हजार ५०० रुपयांवर आली आहे. गेल्या शुक्रवारी याच भावावर आलेल्या चांदीच्या भावात शनिवारी ५०० रुपयांची वाढ होऊन ती ६५ हजारांवर पोहोचली होती. तेव्हापासून त्याच भावावर स्थिर होती.