शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईच्या संकटाचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:15 IST

जलसंपदामंत्र्यांनी केले पाणी जपून वापराचे आवाहन

ठळक मुद्दे पाणी जपून न वापरल्यास एप्रिलपासूनच पाणी टंचाईची भितीजळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षण एरंडोलची समस्या गंभीर

जळगाव: जळगाव शहर व जामनेरचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या वाघूर धरणात यंदा कमी पाणीसाठा आहे. केवळ निम्म्यावर हा पाणीसाठा असल्याने पाणी जपून वापरा. थोडी कळ सोसून सहकार्य करा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मेहरूण तलावावर आयोजित रावण दहन कार्यक्रमाप्रसंगी केल्याने जळगाव, जामनेरवर पाणीटंचाईचे संकट गडद झाले असल्याचे संकेत मिळाले आहेत.महाजन म्हणाले की, वाघूर धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहराची, जामनेरची पाणीयोजना या धरणावरच आहे. ते पाणी संपले तर कुठलीच पर्यायी सोय नाही. त्यामुळे जामनेर, जळगावकरांनी थोडी कळ सोसून पाणी जपून वापरावे. काटकसर करून सहकार्य करावे. तरच एप्रिल, मे महिन्यात व्यवस्थित पाणीपुरवठा होऊ शकेल.जळगाव, जामनेरला मागणीएवढेच आरक्षणवाघूर धरणात जेमतेम ४४ टक्के पाणीसाठा आहे. ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. जळगाव शहरासाठी १४१५ एमसीएफटी तर जामनेरसाठी ९२ एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी मागील वर्षी होती. त्यानुसार आरक्षण देण्यात आले होते. यंदाही तेवढीच मागणी असून त्यानुसार आरक्षण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतच मंजूर करण्यात आले होते. मात्र भोकरबारीच्या विषयावर घोळ चालल्याने पाणी आरक्षणाचा आरखडा अंतीम झालेला नव्हता. आता आठ दिवसांत त्याबाबत बैठक होऊन अंतीम मंजुरी होणार आहे.एरंडोलची समस्या गंभीरपारोळ्यासाठी मागील वर्षी १०० एमसीएफटी पाणी आरक्षणाची मागणी केली होती. मात्र ७५ एमसीएफटी एवढेच आरक्षण दिले होते. यंदा ७५ एमसीएफटी आरक्षणाची मागणी करण्यात आली असून तेवढेच मंजूरीची शिफारस प्रशासनाने केली आहे. मात्र एरंडोलसाठी अंजनी धरणातून मागील वर्षी ६० एमसीएफटीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी ३० एमसीएफटी देण्यात आले होते. यंदाही ३० एमसीएफटीच पाणी दिले जाणार आहे. तर १५ एमसीएफटी कासोद्याला दिले जाणार आहे. यंदा अंजनी धरणात केवळ ८२ एमसीएफटी मृत पाणीसाठा आहे. त्यातून हे ३० व १५ एमसीएफटी पाणी देणे शक्य असले तरीही फेब्रुवारीपर्यंतच ते देणे शक्य होईल. कारण बाष्पीभवनामुळे पाण्याच्या साठ्यात नंतर वेगाने घट होणार आहे. त्यामुळे एरंडोलची समस्या गंभीर आहे.