शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विश्वासात न घेताच ठरावावरघेतली स्वाक्षरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 12:52 IST

नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांचे आयुक्तांना पत्र

ठळक मुद्दे डॉ.विकास पाटील यांच्या नियुक्तीस दर्शविला विरोध

जळगाव : मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याजागी डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्याचा ठरावावर आपणास विश्वासात न घेता माझी स्वाक्षरी घेण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भाजपाचे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला आहे. याबाबत दारकुंडे यांनी आयुक्तांना पत्र देखील दिले आहे.मनपाची महासभा ५ मार्च रोजी पार पडली. या महासभेत भाजपाकडून मनपा आरोग्य अधिकारी उदय पाटील हे आरोग्य अधिकारीपदासाठी पात्र नसल्याने त्यांच्या जागेवर वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार असलेले डॉ.विकास पाटील यांची नियुक्ती करण्यात यावी असा ठराव करण्यात आला होता. भाजपातील काही नगरसेवकांचा या ठरावाला विरोध असताना हा ठराव करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र, आता या ठरावावरून भाजपा नगरसेवकांकडून उघड-उघड नाराजी व्यक्त केली जात असल्याचे दिसून येत आहे.नवनाथ दारकुंडे यांनी ७ मार्च रोजी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे.भाजपातील गटबाजी पुन्हा उघडकोणतीही महासभा होण्यापुर्वी भाजपाच्या सर्व नगरसेवकांची बैठक घेतली जाते. त्या बैठकीत पक्षाकडून आलेल्या प्रस्तावांवर चर्चा करून, त्या प्रस्तावाला मंजूरी द्यायची की नाही ? याबाबतची भूमिका निश्चित केली जाते. दारकुंडे यांनी भाजपाच्याच ठरावाला विरोध केल्यामुळे पक्षाकडून येणाऱ्या प्रस्तावाबाबत नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून याआधी गाळेधारकांवरील ५ पट दंड रद्द करण्याचा ठराव, यासाठी समिती स्थापन करण्याचा ठरावाच्या वेळी देखील अनेक नगरसेवकांना नाराजी व्यक्त केली होती. यावरून सत्ताधारी भाजपामध्ये धुसफूस सुरु असल्याचे म्हटले आहे.ठराव बेकायदेशीर ठरण्याची भितीदारकुंडे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भाजपाकडून आरोग्य अधिकाऱ्यांचा बदलीबाबत महासभेत जो प्रस्ताव देण्यात आला होता. त्या प्रस्तावावर पक्षाकडून माझी स्वाक्षरी घेण्यात आली. मात्र, ही स्वाक्षरी मला विश्वासात न घेताच घेण्यात आली असल्याचे दारकुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. वास्तविक २०१३ ते २०१८ मध्ये नगरसेवक असताना डॉ.विकास पाटील यांना गैरकाराबाबत जबाबदार धरून त्यांना बडतर्फ करण्याचा ठराव करण्यात आला होता. तसेच त्यांची चौकशी करण्याचे देखील ठरले होते. मात्र, त्यांची या प्रकरणात चौकशी झालेली नाही. दरम्यान, भविष्यात त्यांना मुळ पदावर घेतल्यास हा ठराव बेकायदेशिर ठरण्याची भीती असल्याने त्यांच्या नियुक्तीस दारकुंडे यांनी विरोध दर्शविला आहे.मागील वेळेस नगरसेवक होतो, त्यावेळी डॉ. विकास पाटील यांच्याविरोधात ठराव मांडला होता. आता त्यांच्या समर्थनार्थ ठराव करावा, हे पटत नसल्याने आपला ठरावास विरोध आहे.- नवनाथ दारकुंडे, नगरसेवक.