शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षांपासून रंगणारा पत्त्यांचा डाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 18:46 IST

आखाजीला पंच मंडळाचा ठराव : धरणगाव येथील निर्णयाचे सर्वत्र स्वागत

धरणगाव : येथील मोठा माळी वाडा समाज पंच मंडळाने या वर्षापासून माळी वाड्याच्या परिसरात तसेच रामलीला चौकात आखाजीस पारंपरिक पध्दतीप्रमाणे पत्ते खेळणे बंद करण्याचा ठराव केला. आणि या ठरावाची कडक अमंलबजावणी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शंभर वर्षांपासून येथील माळी वाड्यात आखाजीनिमित्त रंगणारा पत्त्यांचा डाव बंद झाला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निर्णयाचा आदर्श अवघ्या खान्देशने घ्यावा, असा सूर निघत आहे.येथील मोठा माळी वाडा परिसरातील पंच मढीजवळ, रामलीला चौकात, जांजीबुवा चौकात दरवर्षी आखाजीनिमित्ताने परंपरेच्या नावाने तब्बल आठ दिवस बिनधास्तपणे पत्त्यांचा डाव रंगत असे. जुगारी कुणाचीही भीती न बाळता राजरोसपणे या चौकात पत्ते खेळत असत. त्यातून फक्त माळीवाड्यातच अदमासे दीड कोटीची उलाढाल होत असल्याचा अंदाज होता. मात्र भरवस्तीतील चौका-चौकात रंगणाऱ्या या डावामुळे पूर्ण वाड्याला यात्रेचे स्वरूप येत असे. महिला व बालकांवर याचा विपरीत परिणाम होत होता. कधी-कधी जुगाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी व्हायची. या सर्व बाबींचा विचार करून मोठा माळी वाडा पंच मंडळाने पंधरा दिवसांपूर्वी अध्यक्ष विठोबा नामदेव माळी, उपाध्यक्ष योगराज गिरधर महाजन, निंबाजी सदू महाजन, सचिव दशरथ महाजन व पंच मंडळाच्या उपस्थितीत बैठक घेऊन माळी वाडा परिसरात पत्त्त्यांचा डाव बंद करण्याचा ठराव करुन निर्णय घेण्यात आला होता. ७ रोजी आखाजी झाली. तसेच त्यानंतर चार दिवस चालणारी रामलीला सुरळीतपणे सुरू असून एकही दिवस एकही डाव यावर्षी माळी वाडा परिसरात खेळला गेलेला नाही. माळी समाज पंच मंडळाच्या निर्णयाची कडक अंमलबजावणी झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.मोठा माळी वाडा समाज पंच मंडळाने मीटिंग घेऊन या वर्षापासून माळी वाडा परिसरात पत्त्यांचा डाव बंद करण्याचा ठराव केला होता. या निर्णयाला सर्व प्रतिष्ठित मंडळींनीही पाठिंबा दिला होता. या निर्णयाची कडक अंमलबजावणी सर्वाच्या मदतीने झाली. यामुळे ‘केल्याने होत आहे...आधी केलेच पाहिजे’ या उक्तीचा प्रत्यय आला. सामाजिकदृट्या हा ऐतिहासिक निर्णय आहे, असे मला वाटते.- योगराज गिरधर महाजन, उपाध्यक्ष, माळी समाज पंच मंडळ, धरणगाव.