शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे सफला एकादशीनिमित्त वारकऱ्यांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 21:27 IST

सफला अर्थातच मार्गशीर्ष कृ. एकादशीनिमित्ताने मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे लाखावर आलेल्या भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देलाखावर भाविकांनी घेतले संत मुक्ताईचे दर्शनदिवसभर भाविकांची गर्दी

मुक्ताईनगर, जि.जळगाव : सफला अर्थातच मार्गशीर्ष कृ. एकादशीनिमित्ताने मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे लाखावर आलेल्या भाविकांनी संत मुक्ताईचे दर्शन घेतल्याने कोथळी आणि मुक्ताईनगर येथे अक्षरश: वारकऱ्यांची मांदियाळी रविवारी बघायला मिळाली.चातुर्मास समाप्तीनंतर येणारी पहिलीच वारी व पवित्र मार्गशीर्ष मासात येणाºया एकादशीला अधिक महत्त्व असल्याने संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्री क्षेत्र कोथळी येथे सोमवारपासून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पहाटे काकडारती मंगलमय वातावरण तयार झाले असताना संत मुक्ताबाई अभिषेक पूजा प्रमोद पांडव नांदुरा यांनी सपत्निक केली, तर नवीन मंदिरात अभिषेक शैलेश शांताराम महाजन, जोतिताई शैलेंद्र महाजन यांनी केले.जुन्या मुक्ताबाई मंदिरात गजानन कासार बोदवड, गंभीर चौधरी विटवेकर, विष्णू राणे कोथळी, वाघाडी गावकरी यांनी आठ क्विंटल साबुदाणा खिचडी वाटप केले. विठ्ठल मंदिरात चिनावलच्या ग्रामस्थांनी फराळ वाटप केले, तर नवीन मुक्ताबाई मंदिरात जगनाथ सुपडू माळी वरणगाव, कडू पाटील धामदे आणि शांताराम तुकाराम महाराज (तुरकगोरडा, मध्य प्रदेश) यांनी फराळ वाटप केले.दुपारी दर्शन रांगेत २० हजारावर भाविक प्रतीक्षेत होते. दुपारी महाराज खोडके यांचे कीर्तन तर रात्री रविदास महाराज यांचे कीर्तन झाले. नवीन मुक्ताबाई मंदिरात विजय महाराज खवले यांचे कीर्तन झाले.सपोनि शिंदे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू असूनही भाविकांची गैरसोय झाली नाही.सफला एकादशीनिमित्त जवळपास लाखाच्या वर भाविकांनी आज दर्शन घेतले. जुन्या मुक्ताबाई मंदिरावर कोथळी गावाकडून असलेल्या प्रवेशद्वारापर्यंत व त्याच्याही बाहेर दर्शनाची रांग पोहोचलेली होती. तसेच नवीन मुक्ताई मंदिरातदेखील तीच परिस्थिती होती. मुक्ताईच्या दर्शनासाठी मध्य प्रदेशातील बºहाणपूर जिल्हा, खंडवा जिल्हा, विदर्भातील बुलढाणा व जळगाव जिल्ह्यातून जवळपास ४० ते ५० दिंड्या या दर्शनासाठी दाखल झालेल्या होत्या.सोमवारी सद्गगुरू झेंडूजी महाराज बेळीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने गादीसेवक भरत महाराज पाटील यांचे कीर्तन होईल. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर