शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तीन पुरवठा निरीक्षकांना ‘कारणे दाखवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 00:54 IST

पॉस मशीनचा वापर होत नसल्याने कारवाई : पुन्हा प्रशिक्षण घेण्याच्या पारोळा तहसीलदारांना सूचना

ठळक मुद्देअचानक भेट देवून केली पाहणीहलगर्जीपणा केल्याचा ठेवला ठपका१ सप्टेंबरपासून पॉस मशीन सक्तीचे

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : पॉस मशीनचा वापर न करताच धान्य वितरण होत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी पाठविलेल्या फिरत्या पथकाला आढळून आल्याने जामनेर येथील चार दुकानांचे परवाने निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी जामनेर येथील अतुल सानप व एस.के. भावसार या दोघा पुरवठा निरीक्षकांना तसेच पारोळा येथील एका पुरवठा निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.धान्य वितरण आॅनलाइन प्रणालीद्वारेच करण्याचे आदेश असताना अनेक रेशन दुकानदारांनी पॉस मशीन कार्यरतच केलेले नाहीत. पॉस मशीनचा वापर न करता ‘मॅन्युअली’ धान्य वाटप करणाºया जामनेर तालुक्यातील रेशन दुकानांची मंगळवार, ८ रोजी पुरवठा विभागाच्या पथकाने अचानक भेट देऊन तपासणी केली. त्यात पॉस मशीनचा वापर न करताच धान्य वाटप करणाºया ४ रेशन दुकानांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. दरम्यान, कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जामनेर तालुक्यातील दोन व पारोळा तालुक्यातील एक अशा तीन पुरवठा निरीक्षकांना शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्याकडून १४ तारखेपर्यंत खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच पारोळा तालुक्यातून काही रेशन दुकानदारांनी ते अशिक्षित असल्याने त्यांना पॉस मशीन वापरता येत नसल्याची तक्रार केल्याने दुकानदारांचे पुन्हा प्रशिक्षण घेण्याचे आदेश पारोळा तहसीलदारांना देण्यात आले आहेत.जिल्ह्यात एकूण १९२९ रेशन दुकाने असून, त्यापैकी ८ दुकानांवरील पॉस मशीन तांत्रिक बिघाडामुळे दुरुस्तीला पाठविण्यात आले आहेत. तर उर्वरित १९२१ दुकानांवर पॉस मशीन बसविण्यात आले आहेत. सध्या धान्य वितरण सुरू असल्याने धान्य वितरण झालेल्या दुकानांमधीलच पॉस मशीन सुरू आहेत. ८२.६७ टक्के पॉस मशीन सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २० तारखेपर्यंत धान्य वाटप होत असल्याने त्यानंतरच खरी आकडेवारी लक्षात येईल. दरम्यान, १ सप्टेंबरपासून पॉस मशीन सक्तीचे करण्यात आले आहे.ाप्टेंबर महिन्यापासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील शंभर टक्केव्यवहार बायोमेट्रीक पध्दतीने होतील. बायोमेट्रीक व्यवहारामुळे २५टक्के धान्याची बचत होणार असून स्वस्त धान्याचा होणारा काळाबाजार बंद होण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी जाहीर केले आहे. जे लाभार्थी धान्य घेत नाही त्यांची नांवे यादीतून वगळण्यात येतील. दर तीन महिन्याने लाभार्थी यादीचे सार्वजनिक वाचन होईल. अपात्र नावे वगळण्यात येतील व पात्र लाभार्थ्यांच्या नावाचा समावेश करण्यात येणारआहे.