शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा; शेतकऱ्यांवर संकट

By ajay.patil | Updated: August 21, 2023 18:47 IST

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत कृषी अधिकाऱ्यांची माहिती : पालकमंत्र्यांच्या चौकशीच्या सूचना

जळगाव - जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पीकांची स्थिती सध्यातरी चांगली आहे. मात्र, या चांगल्या स्थितीतही कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारण, जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना युरीया मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा असल्याची धक्कादायक माहिती दिली.

सोमवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांना युरीया मिळत नसल्याची तक्रार केली. त्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून युरीया मिळत नसल्याच्या तक्रारी येत असल्याचे सांगितले. याबाबत जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी सुरज जगताप यांच्याकडून माहिती घेतली असता, जिल्ह्यात तब्बल २० हजार मेट्रीक टन युरीयाचा तुटवडा असल्याचे सांगितले. तसेच कंपन्यांकडून नवीन रॅक उपलब्ध होत नसल्याचे सांगितले.

कृषी अधिक्षक म्हणतात साठा पुरेसा, जि.प.चे अधिकारी म्हणतात तुटवडाया बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर जि.प.च्या कृषी अधिकाऱ्यांनी युरीयाचा तुटवडा सांगितला. तर कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर यांनी मात्र २० हजार मेट्रीक टनचा साठा कृषी केंद्र चालकांकडे असल्याचे सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत मोठी तफावत असल्याने कृषी विभागातच मोठा घोळ असल्याचे चित्र दिसून आले. तसेच युरीयाचा तुटवडा असतानाही कृषी विभागाकडून कारवाई होत नसल्याने आमदार मंगेश चव्हाण यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

साठा करणाऱ्या  केंद्र चालकांवर कारवाई कराजिल्ह्यात कृषी केंद्र चालकांकडून युरीयाचा साठा करून, लिकींगचे प्रकार वाढले असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. कृषी केंद्र चालकांकडून युरीयाचा साठा करून, कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असून, अशा कृषी  केंद्र चालकांवर कारवाईची मागणी जिल्हा नियोजन समितीतील आमदारांनी केली. त्यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी, कृषी विभागाला तत्काळ अशा कृषी केंद्रची तपासणी करून, कृषी चालकांवर कारवाईचे आदेश दिले.