शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विमा योजनांवरून बँकांचाच सावळा गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2017 01:03 IST

लोकमत सव्रेक्षण : पंतप्रधान जीवन सुरक्षा, जीवनज्योती विमा योजनांबाबत बँक कर्मचारीच अनभिज्ञ

धुळे : केंद्र सरकारने 2015 मध्ये कार्यान्वित केलेल्या पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवनज्योती विमा योजनेबाबत बँकांमध्ये असलेला सावळा गोंधळ ‘लोकमत’ सव्रेक्षणात गुरुवारी दिसून आला़ सदर योजनांबाबत बँक कर्मचारीच अनभिज्ञ असल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आह़े केंद्र सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना जाहीर केल्या असून या योजनांचा लाभ अनेक लाभार्थीनी विविध बँकांच्या माध्यमातून घेतला आह़े त्यानुसार या योजनेत सहभागी लाभार्थीच्या खात्यातून योजनांच्या हप्त्याची रक्कम अनुक्रमे 12 व 330 रुपये कपात करण्यात आले आहेत़ मात्र प्रसंग उद्भवल्यास या विम्याचा लाभ कसा मिळेल, कुणाशी व कसा संपर्क कसा करायचा, क्लेम कसा व कुठे मिळणार, या विमा पॉलिसीचा नंबर काय, कंपनी कोणती, या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी ‘लोकमत’ प्रतिनिधीने गुरुवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत शहरातील सहा बँकांमध्ये ग्राहक म्हणून जाऊन या योजनांबाबत विचारणा केली असता अधिकारी, कर्मचा:यांकडून मिळालेली उत्तरे पुढीलप्रमाण़े़़अशा आहेत योजना़़पंतप्रधान जीवन सुरक्षा विमा योजना व जीवनज्योती विमा योजना या दोन्ही योजनांची सुरुवात फेब्रुवारी 2015 मध्ये झाली आह़े जीवन सुरक्षा योजनेसाठी वयाची अट 18 ते 70 वर्षे असून 12 रुपयांचा वार्षिक हप्ता भरल्यानंतर लाभार्थीचा 2 लाख रुपयांचा विमा असणार आह़े लाभार्थीचे निधन झाल्यास कुटुंबातील सदस्याला त्याचा लाभ मिळेल़ तर जीवनज्योती योजनेसाठी 18 ते 50 वर्षे वयोमर्यादा असून वार्षिक हप्ता 330 रुपयांचा आह़े निधन झाल्यास कुटुंबातील सदस्याला या योजनेचा लाभ मिळेल़ या योजनांबाबत धुळ्यात जागृती झाली नसल्याने लाभार्थीना त्याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही़