जळगाव - तालुक्यातील अनेक गावांमध्ये महावितरणने अघोषीत भारनियमण पुकारल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आव्हाणे, फुपनगरी, खेडी व वडनगरी या गावांमध्ये दररोज तीन ते चार तास वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. तसेच वीज पुरवठा बंद ठेवण्याचे कारण देखील महावितरणकडून सांगितले जात नसल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
प्रभाग क्रमांक ७ मधील चाºया बुजविण्याची मागणी
जळगाव - अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत जलवाहिणीचे काम सुरु आहे. प्रभाग क्रमांक 7 मधील शिव कॉलोनी भागात खोदलेल्या चाऱ्या बुजविण्यात आलेल्या नाहीत. या चाऱ्या व्यवस्थितरित्या बुजविण्यात याव्यात अशी मागणी नगरसेवक सचिन पाटील यांनी अमृत योजनेचे मक्तेदार जैन इरिगेशन कंपनीकडे केली आहे. तसेच चाऱ्या दुरुस्त न केल्यास कार्यलयासमोर उपोषणाचा देखील इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
घनकचरा प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करा
जळगाव - आव्हाणे शिवारातील मनपाचा घनकचरा प्रकल्प काही वर्षपासून बंद आहे. यामुळे याठिकाणी कचऱ्याला लागणाऱ्या आगीतून निघणाऱ्या धुराचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. प्रकल्पाच्या कामासाठी निविदा काढण्यात आली असून, तरीही कामाला सुरुवात झाली नाही. मनपाने त्वरित कामाला सुरुवात करावी अशा सूचना शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी मनपा आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा जोशी यांनी दिला आहे.
तापमानात 3 अंशाची घट
जळगाव - शहराच्या तापमानात एकाच दिवसात 3 अंशाची घट झाली आहे. मंगळवारी किमान तापमान 19 अंशावर होते.मात्र, बुधवारी शहराचे वातावरण सकाळपासूनच निरभ्र होते. ढगाळ वातावरण नसल्याने किमान तापमानात घट झाली असून, बुधवारी किमान पारा 16 अंशावर आला होता. दरम्यान, आठवडाभरात तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे.