शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास्कचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. दररोज हजाराच्या संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. दररोज हजाराच्या संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी दररोज शेकडोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडत आहे. गंभीर म्हणजे, पन्नास टक्केच नागरिक तेथे मास्कचा वापर करताना बघायला मिळाले.

कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही तर शेतकरी आणि ग्राहकांनादेखील फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याने कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे. याठिकाणी जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून कोरोनाचा प्रसार बाहेरदेखील करू शकतात. अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनासह महापालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.

कोरोनाचा उद्रेक; पण गांभीर्य नाही..

जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे व भाजीपाला मार्केट आहे. याठिकाणी दररोज पहाटे ५ वाजेपासून शेतीमालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये सुमारे दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून याठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे ५ ते सकाळी १० वाजेपर्यंत लिलाव सुरू असतो. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्कदेखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता जिल्ह्यात दरारोज हजारांच्या संख्‍येने बाधित आढळून येत आहेत. त्यात शहरातसुद्धा मोठ्या प्रमाणावर बाधित आहेत. त्यामुळे सर्वात धोक्याची बाब म्हणजे, याठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय येथून फळे आणि भाजीपाला घराघरात जातो. अशाने कोरोनाचा फैलाव रोखणे कठीण होऊ शकते. कुठलीही तपासणी नाही बाजारात येणारे व्यापारी, आडते, शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था प्रवेशद्वाराजवळ कुठेही दिसून आली नाही. दरम्यान, बाजार समितीत येत असलेल्या व्यक्तीने मास्क घातलेला आहे की नाही, हेसुद्धा तपासले जात नव्हते. दरम्यान, शेतीमाल हा नाशवंत असल्याने, शिवाय हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल पाहता बाजार समिती जास्त दिवस बंद ठेवणे शक्य नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाईल व कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न होईल, अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे.