शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी भरताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 15:10 IST

गोंदेगावची घटना : जलसंपदा मंत्र्याच्या तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर

शेंदूर्णी, ता. जामनेर: येथून जवळच असलेल्या गोंदेगाव तालुका जामनेर येथील ज्ञानेश्वर भागवत सोनवणे ( वय २५) या तरुणाचा पाणी भरताना वीजेचा शॉक मृत्यू झाला.त्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.दरम्यान, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या तालुक्यात पाणी प्रश्न गंभीर झाला.उपाय योजनेची गरज आहे. माहिती अशी की, ज्ञानेश्वर भागवत सोनवणे यांनी पाणी भरण्यासाठी पाण्याचा टँकर आणला होता. टँकरवर वीज मोटात लावून पाणी भरण्यासाठी धावपळ करीत असताना अचानक त्याचा वीज तारेला स्पर्श होऊन शॉक लागून तो खाली पडला. वीज मोटर पुन्हा अंगावर पडली या अपघाती दुदैर्वी घटनेने तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.जिल्हयाकडे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलसंपदा खाते असल्याने जामनेर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यात विविध धरणे, पाण्याच्या समस्या सुटतील अशी सर्वांनाच आशा होत्या परंतु गोंदेगाव येथील तरुणाचा पाण्यामुळे दुदैर्वी मृत्यू झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. गावातील काही प्रतिष्ठित मंडळींनी समजूत काढत दुपारी जामनेर येथे शवविच्छेदन करून त्याच्यावर गोंदेगाव तालुका जामनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या घटनेची चौकशी करण्याची मागणी शेंदुर्णीसह परिसरातून करण्यात आली आहे.