शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
5
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
6
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
7
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
8
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
9
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
10
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
11
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
12
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
14
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
15
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
16
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
17
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
18
ऐरोली, घणसोलीत होणार खारफुटी उद्याने; वनविभागाकडून वास्तुविशारदांची नियुक्ती
19
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
20
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे

शहरात शिवजयंती उत्साहात साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:44 IST

महाराणा प्रताप विद्यालय जळगाव : दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयात ...

महाराणा प्रताप विद्यालय

जळगाव : दि. पूर्व खान्देश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यामिक व उच्च माध्यामिक विद्यालयात मुख्याध्यापिका साधना शर्मा यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक डी.बी. सोनवणे यांच्यासह इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन विजया ठाकूर यांनी तर आभार माया पाटील यांनी मानले.

पद्मालया इंग्लिश मीडियम स्कूल

साने गुरुजी फाउंडेशन, शिरसोली संचलित पद्मालया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्राचार्या स्वाती चौधरी यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपशिक्षिका संगीता बारी, हेमंत नेमाडे, मनीष पाटील, आशिष तेलगोटे, संजय कोळी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

भंगाळे माध्यमिक विद्यालय

युवा विकास फाऊंडेशन संचलित सीताबाई भंगाळे माध्यामिक विद्यालयात मुख्याध्यापक नरेंद्रकुमार बोरसे, प्राथमिकचे प्रफुल्ल सरोदे, अनुपमा कोल्हे, दीपनंदा पाटील, स्वाती पगारे, सचिन महाजन, दीपक भारंबे, विजय नारखेडे, प्रशांत भारंबे, भूषण भोळे यांनी अभिवादन केले.

अध्यापिका विद्यालय

अध्यापिका विद्यालयात प्राचार्या सुवर्णा चौधरी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक ललित नेमाडे, दीपक पिंगळे, चेतन लोहार, शारदा धांडे, वैशाली राठोड, योगिता तळेले, प्रवीण वायकोळे, नीलिमा वारके, उमेश चौधरी, स्नेहल ठाकूर आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन ज्योती इंगळे यांनी तर आभार जागृती भोळे यांनी मानले.

गुळवे विद्यालय

पुष्पावती गुळवे विद्यालयात पर्यवेक्षक डी.आर. माळी यांच्याहस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी मुख्याध्यापिका एच.आर. पाटील व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते. यानंतर इयत्ता ९ वीच्या विद्यार्थांच्या चित्रकला स्पर्धांही घेण्यात आल्या.

श्री अष्टांग बहुउद्देशीय संस्था

श्री अष्टांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सदस्या अंजू कुमावत, राजू शर्मा, गोपाळ पाटील, संजय निकम, चंद्रकांत सुरडकर, शैलेश वाघ, हर्षल कुमावत उपस्थित होते.

न्यू इंग्लिश मीडियम स्कूल

न्यू इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे मुख्याध्यापक योगेश चौधरी यांनी प्रतिमा पूजन केले. यावेळी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

महात्मा गांधी विद्यालय

भादली येथील महात्मा गांधी विद्यालयात नवनिर्वाचित सरपंच मिलिंद चौधरी, उपसरपंच संदीप कोळी यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात

आले. सूत्रसंचालन कलाशिक्षक आर.पी. अत्तरदे यांनी केले.

शारदा विद्यालय

सरदार वल्लभाई पटेल शिक्षण मंडळ संचलित शारदा माध्यामिक विद्यालयात मुख्याध्यापक आर.एन. पाटील यांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी संगीता पाचपांडे, दीपक पाटील, मनीषा चौधरी, शिवाजी पाटील, संजय घुगे, ममता पाटील, संजय सपकाळे, नितीन अग्रवाल, यशवंत गुजर, हेमचंद्र इंगळे, अजय झोपे, नीलेश बोरोले उपस्थित होते.