शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

शेतकऱ्यांना थकीत रक्कम मिळण्यासाठी शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:23 IST

चोसाका प्रकरण : तहसीलदारांच्या आदेशानंतर आंदोलन मागे

 

चोपडा : चहार्डी येथील साखर कारखान्यास परिसरातील सभासद ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २०१४-१५ या गळीत हंगामासाठी ऊस पुरविला होता. त्यावेळेचे प्रतिटन ६०० रुपये प्रमाणे रक्कम साखर कारखान्याकडे थकीत आहे. त्या पैशांच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तहसील कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.१३ कोटी १३ लाख ८७ हजार रुपये बुलढाणा अर्बन बँकेकडून वसुली करण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा ३ आॅगस्ट रोजीचा आदेश आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सदर रक्कम शेतकºयांना तत्काळ वसूल करून द्यावी, असा आदेश होता. परंतु याकडे संचालक मंडळाने दुर्लक्ष केले. शेतकºयांना तत्काळ पेमेंट मिळावे म्हणून शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी तहसील कार्यालयासमोर ५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकरा वाजेच्यासुमारास ठिय्या आंदोलन केले.यावर पर्याय म्हणून बुलढाणा अर्बन पतसंस्थची सर्व खाती सील करून सदर रक्कम चोपडा साखर कारखान्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग होत नाही तोपर्यंत खाती सील केली जातील असे तहसीलदार अनिल गावित यांनी सांगितले. आंदोलनात ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक जोहरी, तालुकाप्रमुख राजेंद्र बिटवा (पाटील), शहराध्यक्ष आबा देशमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती एम.व्ही. पाटील, पंचायत समिती सदस्य भरत बाविस्कर, दीपक चौधरी, चौगावचे माजी सरपंच सुकलाल कोळी, अ‍ॅड.शिवराज पाटील, शरद पाटील, अ‍ॅड.एस.डी.सोनवणे आदी उपस्थित होते.