शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या छायाबाई जितेंद्र पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 18:44 IST

बिनविरोध निवड

पारोळा- येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या इंधवे येथील छायाबाई जितेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या सभापती छाया राजेंद्र पाटील यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी छायाबाई जितेंद्र पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.७ रोजी दुपारी ३ वाजता सर्व सदस्यांची बैठक पिठासन अधिकारी तहसिलदार अनिल गवांदे यांनी घेतली. यावेळी यावेळी छायाबाई जितेंद्र पाटील यांचेसह सुनंदा पांडुरंग पाटील, अशोक नगराज पाटील, छायाबाई राजेंद्र पाटील, ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, प्रमोद रमेश जाधव, रेखाबाई देविदास भिल आदी सभागृहात उपस्थितीत होते. भाजपच्या सदस्या सुजाता बाळासाहेब पवार मात्र गैरहजर होत्या.ही निवड जाहीर होताच ढोलताशांचा गजर व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी छाया पाटील यांचा सत्कार केला. यावेळी जि. प .सदस्य डॉ हर्षल माने , कृ उ बा चे सभापती अमोल पाटील , जि. प .सदस्या रत्नाबाई रोहिदास पाटील, संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, उपसभापती मधुकर पाटील, प्रा आर. बी. पाटील, चेतन पाटील, सुधाकर पाटील , डॉ. पी .के .पाटील, पांडुरंग पाटील, राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते .यावेळी माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले की, ४० वर्षानंतर राजकीय घडामोडीत ही ऐतिहासिक ही घटना आहे . सर्व पक्षीय सदस्य एकत्रित येऊन सभापती पदाचा उमेदवार बिनविरोध निवडून दिला. एक राजकीय परिपक्वता यातून दिसून आली आहे. आणि छायाबाई राजेंद्र पाटील यांचे राजीनामा दिल्याबद्दल कौतुक केले. यावेळी डॉ. हर्षल माने व चतुर पाटील यांनी मनोगते व्यक्त केली .राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी शब्द पाळला.गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छायाबाई राजेंद्र पाटील या शिवसेनेचा टेकू घेऊन सभापतीपदी विराजमान झाल्या होत्या. १ वर्षासाठी कालावधी संपल्यावर ठरल्याप्रमाणे त्यांनी सभापती पदाचा राजीनामा दिला. आणि शिवसेनेच्या सदस्या छायाबाई जितेंद्र पाटील यांना सभापती होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी मदत करीत दिलेला शब्द पाळला हे विशेष.