आॅनलाईन लोकमत भुसावळ,दि.२० : राजकीय व्यक्तींनी शिवसेनेला मुस्लीम विरोधी असल्याचा रंग दिला. अमरनाथ यात्रेकरूंना वाचविल्यानंतर सर्वात पहिल्यांदा शिवसेनेनेच आपला सन्मान केला. शिवसेना मुस्लीम विरोधी पक्ष नसल्याचे प्रतिपादन सलीम शेख यांनी भुसावळात सत्काराला उत्तर देतांना केले.अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण वाचविणारे सलीम शेख यांचा भुसावळ शिवसेना युवा सेना शहरतर्फे तिरंगा फेटा, तिरंगा बुके देऊन सत्कार करण्यात आला. १८ रोजी रात्री आठ वाजता शहरातील मनियार हॉलमध्ये झालेल्या या सत्कार सोहळ्यात प्रारंभी शहर शिवसेनेतर्फे शहर प्रमुख मुकेश गुंजाळ, विभाग प्रमुख उमाकांत शर्मा, ज्येष्ठ शिवसैनिक अबरारभाई, मिलिंद कापडे, शिवाजी दाभट, अफसर खान, शुभम पचेरवाल या शिवसैनिकांनी तिरंगा फेटा बांधून ट्रॉफी व बुके देऊन शेख सलीम यांचा गौरव केला.अफसर खान, आरपीआयचे राजू सूर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसंगी रेल कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष ललितकुमार मुथा, माजी नगरसेवक साबीर शेख, इकबालभाई, नगरसेवक शेख शाकीर शेख सरदार, अॅड.मतीन अहमद, सैय्यद सादीक, विकास वलकर, दानिश खान, दीपक काटकर, कृष्णा साळी, राजेश ठाकूर, निखिल सपकाळे आदी शिवसैनिक व मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन शकील पटेल यांनी तर आभार अबरार भाई शेख यांनी मानले.
शिवसेना मुस्लीम विरोधी नाही - सलीम शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 16:28 IST
भुसावळात शिवसेना युवा सेनेतर्फे अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचविणारे सलीम शेख यांचा तिरंगा फेटा व तिरंगा बुके देऊन सत्कार करण्यात आला.
शिवसेना मुस्लीम विरोधी नाही - सलीम शेख
ठळक मुद्देशिवसेना मुस्लिम विरोधी नाहीशिवसेना मुस्लीम विरोधी असल्याचा रंग दिला राजकीय पक्षांनीसर्वात आधी शिवसेनेकडून आपला सत्कार