शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइनमुळे ‘खिचडी’ झालेल्या महासभेत शिवसेना सदस्यांचा ‘दांगडो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:01 IST

सभागृहात सभा घेण्याची मागणी : प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा सत्ताधारी व विरोधी सदस्यांकडून निषेध ; १० कोटीतील ७४ विषयांना ...

सभागृहात सभा घेण्याची मागणी : प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा सत्ताधारी व विरोधी सदस्यांकडून निषेध ; १० कोटीतील ७४ विषयांना मंजुरी ; शौचालयांचा निधीवरून ॲड.हाडा यांची पक्षधोरणाविरोधात भूमिका ; सत्ताधाऱ्यांमधील गटबाजीही उघड

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - महापालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाइन विशेष महासभेत इंटरनेटमुळे अडथळे येत असल्याने शिवसेना सदस्यांनी थेट सभागृहात येऊन, ही सभा ऑनलाइन पद्धतीने न घेता पूर्वीप्रमाणे सभागृहात घेण्याची मागणी करत सभागृहात चांगलाच गोंधळ केला. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आता महासभा सभागृहातच घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना सदस्यांनी केली. शिवसेना सदस्यांच्या गोंधळामुळे महासभेचे कामकाजदेखील बंद पडले. ऑनलाइन महासभेत इंटरनेटमुळे चांगलीच खिचडी झाली. यामुळे सदस्यांना कोणतेही मुद्दे मांडता येत नव्हते व इतरांनी मांडलेले मुद्दे देखील समजत नव्हते. यामुळे शिवसेना सदस्यांनी प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा सभागृहात येऊन निषेध केला.

मनपाच्या विशेष महासभेचे आयोजन बुधवारी करण्यात आले होते. कोरोनामुळे घालून दिलेल्या नियमानुसार ही सभा देखील ऑनलाइन पद्धतीनेचे घेण्यात आली. सभागृहात महापौर भारती सोनवणे, उपमहापौर सुनील खडके, आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे आदी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच इंटरनेटच्या अडचणी यायला सुरुवात झाली. यामुळे कोणत्याही सदस्याला आपले मुद्दे मांडता येत नव्हते. तसेच इतरांचे मुद्देदेखील ऐकू येत नव्हते. त्यामुळे मनपाच्या या ऑनलाइन महासभेचा चांगलाच फज्जा झालेला पहायला मिळाला.

शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात येऊन थांबविले कामकाज

सभेत कोणताही मुद्दा समजत नसल्याने संतप्त शिवसेना नगरसेवक थेट सभागृहात दाखल झाले. तसेच कोणताही मुद्दा समजत नसल्याने ही सभा तहकूब करून, सभागृहात सभा घेण्याची मागणी केली. शिवसेना सदस्य सभागृहात आल्यामुळे सभेचे कामकाजदेखील थांबविण्यात आले. शासनाचे आदेश नसल्याचे सांगत सभा ऑनलाइनच घेण्यात येईल, अशी भूमिका महापौरांनी घेतली. यामुळे सभेत चांगलाच गोंधळ झाला. विरोधी पक्षनेते सुनील महाजन, शिवसेना गटनेते अनंत जोशी यांनी नगरसचिवांना इतर मनपात सभागृहात सभा होत असताना जळगाव मनपात वेगळी भूमिका का? असा प्रश्न उपस्थित केला.

भाजपचेही सदस्य दाखल

शिवसेनेचे नगरसेवकदेखील सभागृहात आल्याने काही वेळात भाजपचेदेखील नगरसेवक सभागृहात दाखल झाले. भाजपच्या नगरसेवकांनी देखील इंटरनेटच्या तक्रारी करत सभागृहातच सभा घेण्याची मागणी केली. सभेचे पुढील कामकाज व्हावे म्हणून वाद शांत करत, भाजपचे नगरसेवक सभागृहाच्या बाहेर गेले. मात्र, शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभागृहातच थांबून सभेत सहभाग घेतला.

ॲड.हाडा यांची पक्षधोरणाविरोधात घेतली भूमिका

१. २५ कोटीतून शिल्लक असलेल्या ३ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीतील ५० लाख रुपयात शहरात शौचालय तयार करण्याचा प्रस्ताव महापौरांनी सादर केला होता. या प्रस्तावाला भाजपच्याच नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी आक्षेप घेत, शहरातील शौचालयांच्या कामासाठी अनेक सामाजिक संस्थादेखील पुढे आल्या आहेत. या संस्थांकडून शौचालये उभारण्यात यावीत, आणि हा निधी इतर कामांवर खर्च करण्यात येण्याची मागणी केली.

२. सामाजिक संस्थांकडे प्रशासनाकडून पाठपुरावा होत नसल्याने ॲड.हाडा यांनी प्रशासनाचा निषेध या सभेत केला. दरम्यान, ॲड.हाडा यांच्या या भूमिकेला भाजपचेच नगरसेवक सचिन पाटील यांनी आक्षेप घेतला. तसेच महापौरांकडे हा प्रस्ताव दिला असल्याने व पक्षाच्या बैठकीत हा विषय ठरल्याने यावर सभागृहाने मंजुरी देण्याची मागणी केली. त्यानुसार हा विषय सभागृहात मंजूर करण्यात आला. मात्र, या विषयावरून भाजपतील गटबाजी पुन्हा थेट सभागृहातच समोर आली.

या विषयांना मिळाली मंजुरी

१. २५ कोटींच्या निधीतील शिल्लक ३ कोटी ३४ लाख रुपयांच्या निधीतून प्रस्तावित ६ कामांना मंजुरी मिळाली. यामध्ये शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामासाठी अडथळा ठरत असलेले विद्युत खांब हटविण्यासाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली. तसेच या कामासाठी निविदा प्रक्रिया महावितरणकडून न काढता मनपाकडूनच काढण्याचा ठराव देखील सभेत करण्यात आला.

२. वर्षभरापूर्वी स्थापन केलेल्या विविध विशेष समित्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या अकरा समित्या बरखास्त करण्याचा ठराव सभेत करण्यात आला.

३. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार डीपीडीसीकडून मिळणाऱ्या प्रस्तावित १० कोटींच्या निधीतून ७४ कामांच्या खर्चास सभेने मंजुरी दिली. यामध्ये अनेक कामे रस्त्यांची आहेत.

४. शहरातील पिंप्राळा शिवारात फायर स्टेशन उभारण्याबाबत कुलभूषण पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावाला देखील सभेत मंजुरी देण्यात आली.

‘रायसोनी’ नीतीमुळे महापौरांचा कार्यकाळ यशस्वी, शिवसेना करणार सत्कार

महापौर भारती सोनवणे यांनी माजी महापौर प्रदीप रायसोनी यांच्या कामाच्या पद्धतीमुळे विरोधकांनादेखील विश्वासात घेऊन कामकाज केल्यामुळे मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी महापौरांचे आभार मानले. तसेच पुढील महासभेत महापौरांचा शिवसेनेकडून जाहीर सत्कार करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले. महापौर भारती सोनवणे यांच्यासारखे कामकाज आधीच्या महापौरांना जमले नाही व भाजपच्या येणाऱ्या महापौरांनाही जमणार नाही, असाही टोला महाजन यांनी या सभेत हाणला.