शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात आदिवासी पाडे बनताय गुन्हेगारांचे आश्रयस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:59 IST

बनावट नागमणी, मांडूळ तस्करीसह दरोडय़ात सहभाग : परजिल्ह्यात गुन्हे करुन आल्यावर मिळतो सहारा

ऑनलाईन लोकमत

कु:हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर,दि.18 - भुसावळ तालुक्यातील आदीवासी पाडे गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनू पाहात आहेत. या भागात बनावट नागमणी व मांडूळ तस्करी बिनबोभाट सुरू असतांना आता दरोडय़ातही सहभाग दिसून आला आहे. अन्य जिल्ह्यात गुन्हे करुन आल्यानंतर आरोपींना या पाडय़ांवर सहारा दिला जात असल्याचे समोर आले आहे.
धुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून खून केल्या प्रकरणी चारठाणा (मदापुरी) येथून दोघां आरोपींना अटक झाल्यानंतर सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडय़ांवर गुन्हेगारांना आश्रयस्थान मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
आता या गुन्हेगारांचा दरोडय़ा सारख्या गंभीर गुन्ह्यांकडे कल वाढला आहे. पैशांच्या हव्यासापोटी ते रात्रीच्यावेळी दरोडे टाकत आहेत.यात एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जातो. धुळे येथील दरोडा आणि खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याने आदीवासी पाडय़ांवर गुन्हेगारांना आश्रय मिळतो ही बाब समोर आली आहे. 
अवैध व्यवसायाचे केंद्र..
मुक्ताईनगर तालुक्यातील मदापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा ही गावे डोंगराच्या पायथ्याशी असून आदिवासी बहुल आहेत. या गावांमध्ये बनावट नागमणी, मांडूळ तस्करी, करंटचे भांड  आदींचा अवैध व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. परप्रांतीय ग्राहकांना इकडे बोलावून त्यांना लाखोंचा चुना लावला जातो. तसेच त्यांच्याकडील दागदागिने व महागडे मोबाईल हिसकावून त्यांना बेदम मारहाणही केली जाते. यामध्ये आलेला पैसा हा काळा पैसा असल्यामुळे पोलिसांकडे तक्रार द्यायला जात नाहीत.त्यामुळे बनावट नागमणी विकणारांचे फावते.
परप्रांतात करतात गुन्हे 
दरोडे टाकण्यासाठी गुन्हेगार हे परजिल्ह्यात व परप्रांतात जातात. गुन्हा केल्यानंतर ते याच आदिवासी गावांमध्ये लपून राहतात. धुळे जिल्ह्यात दरोडा प्रकरणातही चारठाणा येथील गुन्हेगारांनी मोबाईल पळविले व त्या मोबाईलच्या लोकेशनमुळेच पोलीस त्यांचा माग काढू शकले. अन्यथा हा प्रकार उघड झाला नसता. या भागात लोकांना नागमणी घेण्यासाठी बोलावून त्यांना अक्षरश: ओरबाडले जाते. विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जाते. हे प्रकार आता नित्याचे आहेत.