शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

शिंदीत शेततळ्याने ठरला 'शेतीतला पुरुषोत्तम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:49 IST

योजनेचे फलीत : विहीर कोरडीठाक तरी लावली दहा एकरावर मान्सूनपूर्व कपाशी अन् जगवली लिंबु बाग

लिंबू, शेवगा आणि पेरुची बाग ‘टँकरमुक्त’संजय हिरे।खेडगाव, ता.भडगाव : शासनाच्या 'मागेल त्याला शेततळे..., या योजनेतुन दोन वषार्पूर्वी झालेल्या शेततळ्याच्या माध्यमातून शिंदी येथील पुरुषोत्तम अभीमन सोनवणे या शेतकऱ्याने दुष्काळात विहीर कोरडी असतांना लिंबु बाग तर जगविलीच शिवाय एक महीना पावसाळा उशीरा येवुनही दहा एकरावर मान्सुनपुर्व कपाशी घेण्याचा चमत्कार घडविला आहे.बरड जमीनीचा कायापालटसोनवणे यांची वडिलोपार्जीत दहा एकर शेती डोंगराच्या बाजुस काहीशी बरड-हलक्या प्रकारात मोडते. विहीर असली तरी ब-याचदा एका पाण्यावाचुन हातचे पीक वाया जाई.यामुळेच कृषिविभागाच्या मागेल त्याला शेततळे..या योजनेचा त्यांनी आधार घेत.५२ हजाराच्या अनुदानातुन ४३ बाय ४५ मीटर रुंद व २५-३० फुट खोल शेततळे खोदले.त्यात ६८ हजारात प्लास्टिक अंथरले. अंदाजे दिड लाख खर्च आला. विशेष म्हणजे पडीक, पोटखराब जमीनीवर त्यांनी शेततळे घेतल्याने ती वापरात आली. दोन वषार्पूर्वी पावसाळ्यात विहीरीचे पाणी सोडत तळे पुर्ण भरुन घेतले,अन् कायापालट झाला.पहिल्याच वर्षीतीन लाखाचे वांगेसुरवातीलाच त्यांनी २० गुंठे वांगी लावली.त्यात त्यांना खर्च वजा जाऊन तीन लाख नफा झाला. त्यानंतर खास खान्देशी वाणाचे भरीताचे वांगे लावले.जळगाव येथे विक्री केली. त्यातही चांगले उत्पन्न मीळाले.मोती शेतीचे नियोजनयावर्षी शेततळ्यात त्यांचा मोती शेतीचा प्लँन आहे.यासाठी त्यांनी नुकतेच चहार्डी,ता-चोपडा येथे प्रशिक्षण घेतले आहे.शेतीसाठी पाणी व शेततळ्यावर आधारित दुय्यम व्यवसायाकडे त्यांचा कल आहे.दुष्काळात दहा एकरावर मान्सुनपुर्व कापुस लागवडयावर्षी ऐन उन्हाळ्यात शेततळ्यातील पाण्यावर त्यांनी ठिबकवर तब्बल नऊ एकर मान्सुनपुर्व कपाशी लागवड केली आहे. शिवाय आपल्या काकांच्या एक एकर ठिबकवरील कपाशीला पाणी दिले. एक महिना लांबलेला पावसाळा, शिवारात इतरत्र ढेकळच नजरेस पडत असतांना, त्यांचे शेतात कपाशी बहरतेय.कपाशीच मुख्य नगदी पीक असलेल्या खानदेशात उशीराचा पाऊस,लागवडीनंतर व मधे पडणारा पावसाचा खंड यामुळे मोठा फटका बसतो. शेततळ्यामुळे त्यांच्या कपाशी पिकास हमीचे पाणी उपलब्ध होत श्वाश्वत शेतीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.केवळ शेततळ्यामुळे सोनवणे तीन एकरावरील शेतात २९० रोप लिंबु लागवडीचे धाडस केले.कारण दर उन्हाळ्यात विहीर कोरडीठाक पडते. लिंबुत त्यांनी शेवगा, पेरु ची आंतरबाग लागवड केली आहे. रोपांसाठी कृषिविभागाने सहाय्य केले आहे. या दुष्काळात परिसरातील लिंबु उत्पादकांनी बागा जगविण्यासाठी टँकरवर लाखो रुपयाचा खर्च केला आहे. शिवाय एक-दोन वर्षाआड दुष्काळी स्थितीमुळे टँकरने पाणी देणे नित्याचेच झाले आहे.या खचार्पायी बागा न परवडता शेतक-यांचे आर्थिक कंबरडेच मोडुन पडत आहे. पुरुषोत्तम सोनवणे यांचा शेततळ्यामुळे लिंबु जगविण्यासाठी टँकरवर होणारा लाखो रुपयाचा खर्च वाचला बाग देखील हिरवीगार आहे.आपलं सरकार..पोर्टल मधे शेतकऱ्यांना संधीआता शासनाच्या आपल सरकार.. पोर्टलमधे कृषिविभागाच्या शेततळे, ठिबकसंच आदी अनुदान योजनात आँनलाइन पध्दतीने नोंदणी होत असल्याने सर्वच शेतकºयांना समान संधी उपलब्ध झाली आहे.शेततळे श्वाश्वत शेतीसाठी गरजेचे आहे.शेतीपुरक व्यवसाय देखील करता येतो.राजकारणात गमावले , शेततळ्यात मिळवलेपुरुषोत्तम सोनवणे यांनी याआधी हाँटेल व विटाभट्टी व्यवसाय केला. मागील पं.स.निवडणुकीत त्यांनी भाजपा तर्फे उमेदवारी केली.यात लाखोचा आर्थिक फटका बसला. यामुळे राजकारणापासुन दुर होत त्यांनी शेतीत लक्ष घातले.शेततळे झालेले होतेच.वडील अभीमन अर्जुन सोनवणे यांच्या मार्गदर्शन लाभले.दोन वषार्पासुन शेती एके शेतीच पाहिली आणी शेतीउत्पन्न वाढुन आर्थिक तुट भरुन निघण्यास मदत झाली.मत्यपालनाचा पुरक व्यवसायशेततळ्यामुळे त्यांना मत्यपालनाचा पुरक व्यवसाय उपलब्ध झाला, मागील वर्षी त्यांनी प्रयोग म्हणुन राहु, कटला, कोबंडा या तीन प्रकारचे मत्यबीज तळ्यात सोडले. कृषि मार्फत शासनाच्या मत्य विभागाकडुन त्यांना मत्स्य बिज साठी ४००० रुपये अनुदानचा लाभ मिळाला. मत्स्य बीज सोडल्यानंतर केळीखोड व विवाह आदी कार्यातून वाया जाणाºया अन्नाचा त्यांनी मासे खाद्य म्हणुन वापर केला.चांगले एक-दिड किलो वजनाचे मासे पोसलेत. अल्प खर्चात माशांचे २५ हजारावर उत्पन्न मिळाले. मत्यपालनाच्या जोडीने त्यांनी शेतीपुरक व्यवसाय म्हणुन बोकडपालन केले.सिन्नर येथुन शिरोई जातीचे २६ बोकड आणुन,त्यांना पोसत सहा महिन्यानंतर त्यांची विक्री केली.यातही त्यांना बºयापैकी लाभ झाला.