शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

शाहिरीचा बुलंद आवाज : शाहीर शिवाजीराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:40 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या कार्याविषयी लिहिताहेत लेखक महेश कौंडिण्य.

पाचोरा तालुक्यातलं छोटंसं गाव नगरदेवळा. ऐतिहासिक, पौराणिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राशी नातं जोपासणाऱ्या या गावानं आपली आणखी एक नवीन ओळख निर्माण केली आहे ‘शाहीर शिवाजीराव पाटील’ यांचं गाव!हृदयाचा ठेका चुकवणारा एक पहाडी, बुलंद आवाज गेल्या ४०-४५ वर्षांपासून तितकीच बुलंद हाक देत मराठी मनावर अधिराज्य गाजवतोय आणि तो आवाज म्हणजे शाहीर शिवाजीराव पाटील! सामान्यातल्या सामान्यात सहज वावरणारं हे असामान्य व्यक्तित्त्व! हार्मोनियम वादन, गीत, नाट्य आणि पोवाडे लेखनाची नैसर्गिक देणगी लाभलेल्या शिवाजीरावांना शाहिरी कला, अभिनय आणि सामाजिक कार्य हे जीवनाचं ध्येय वाटतं! मुंबई, पुणे यासारख्या महानगरांपासून तर गाव खेड्यांपर्यंत शाहीर शिवाजीरावांचा पोवाडा दुमदुमतो आणि रसिकांच्या हृदयाला हात घालतो. संत, महात्मे, समाजसेवक, युगपुरुष यांचे पोवाडे गाताना ते भारुड, गोंधळ यासारख्या पारंपरिक लोककलाही जोपासतात. दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती, एडस् जनजागृती, पर्यावरण, लोकशिक्षण, ग्रामस्वच्छता, अंधश्रद्धा, हगणदरीमुक्त गाव यासारख्या विषयांनाही ते सहज जनमानसात पोहचवतात. हातात डफ घेऊन त्यांनी पोवाड्याला सुरुवात करताक्षणी आपसूक लोकांचा जमाव त्यांच्या अवतीभोवती जमा होतो आणि सामान्यातला हा कलावंत असामान्य ज्ञानाचे डोस रसिकांना देऊन जनजागृती करीत त्यांना तृप्त करतो! मराठी, हिंदी आणि अस्सल अहिराणी भाषेचं वरदान लाभलेल्या या ऋषीतुल्य कलावंतानं शेतात राबताना आपल्यावर असलेल्या सरस्वतीच्या वरदहस्ताचा लाभ घेत जशी गीतं आणि पोवाडे लिहिले तसेच त्यांनी स्वलिखीत आणि अनुवादीत नाटकातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.जुलूम, मायेचा संसार, दाजीबाचं कारटं अशा अनेक नाटकातून त्यांनी अभिनय केला.ग्रामीण भागात असूनही हा कलावंत शाहिरी करीत असताना अनेक उपक्रम राबविण्यासाठी धडपडत आहे. राष्टÑीय एकात्मता व जातीय सलोखा अभियान, जागर पर्यावरणाचा, रंग शाहिरी कलेचा, ही रात्र शाहिरांची, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, भ्रृणहत्या जागृती अभियान, व्यसनमुक्त पहाट अभियान, एडस् जनजागृती अभियान असे अनेक सातत्यपूर्ण उपक्रम त्यांनी आजही सुरू ठेवले आहेत.जातीय सलोखा व राष्टÑीय एकात्मता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, पर्यावरण प्रबोधन, बालशाहिरी प्रशिक्षण यासारख्या महाराष्टÑ शासनाच्या उपक्रमात सहभाग घेत असताना त्यांनी सांस्कृतिक विभाग आयोजित शाहिरी महोत्सवात सहभाग नोंदविला, तर शासनाच्या विविध जनजागृती करणाºया उपक्रमातदेखील त्यांनी सहभाग नोंदविला. या हरहुन्नरी कलावंतानं धोंड्यानं लगीन, जुगन रे यासारख्या प्रबोधनात्मक अहिराणी गीतांच्या कॅसेटस्देखील प्रसिद्ध केल्या.‘शायमा तरी जाय, न्हई त ढोरे तरी वाय ।आल्या जमराले जगनं गम्मत समजस् काय?’।।असा सवाल करून शिक्षणाचं महत्त्व सांगणाºया शाहिरांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. सामाजिक न्याय विभागाचा राष्टÑपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, शाहीर गौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे शाहीर भूषण पुरस्कार, गीताई लंबे समाजभूषण पुरस्कार, ज्ञानप्रबोधन पुरस्कारासह त्यांना महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या २०१७-१८ मध्ये मिळालेल्या पुरस्कारांची यादी मोठी आहे.आज आकाशाला गवसणी घालतानाही या कलावंताचे पाय जमिनीला घट्ट रोवलेले आहेत. कोणालाही मोठेपणाचा अहंभाव या कलावंताच्या ठायी दिसत नाही. आलेल्या प्रत्येकाशी हसून बोलत त्याला सहज आपलंसं करणाºया शिवाजीरावांना शाहिरी ही लोककला जोपासली जावी म्हणून तळमळ वाटते. आजही अनेक प्रशिक्षण वर्गातून ते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत शाहिरी तळमळीनं शिकवण्याचा प्रयत्न करतात. लहानात लहान होऊन लोककला जोपासणाºया या उत्तुंग कलावंताला बघून आपण अगदी सहज नतमस्तक होतो हेच खरं!

टॅग्स :artकलाPachoraपाचोरा