शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

केळीवर तीव्र उन्हाचा प्रकोप

By admin | Updated: April 18, 2017 00:38 IST

रावेर : प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल

रावेर : केळीच्या   माहेरघरातच ग्लोबल वॉर्मिगचे पडसाद म्हणून की काय एप्रिलच्या मध्यातच मे हिट सारख्यच 47 डिग्रीच्या असह्य सनस्ट्रोकने केळीला माहेरात पोरकं करून सोडले आहे.  प्रतिकूल,  असह्य तापमानात केळीची खोडं खाली जमिीवर पडत आहेत. तर फळारूपाला येणारा वा परिपक्व झालेली केळीची घडं निसटून  उत्पादकांची अपरिमित हानी सुरू झाली आहे. सनस्ट्रोकच्या  शॉकचे विपरीत परिणाम तत्क्षणीच दिसणारे नसून कालांतराने केळीबाग उद्ध्वस्त झाल्याचे दृष्टिक्षेपात पडत असल्याने शासनाच्या कृषी विभागाने फळपीक विमा कंपनीला यासंदर्भात पाठपुरावा करून केळी उत्पादकांना त्यांच्या न्यायहक्काचा संरक्षित विमा मिळून देण्यात न्यायाची भूमिका बजवावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात              आहे. एकीकडे निर्यातक्षम केळी उत्पादनाचे गोडवे गायिले जात असताना,  एखाद्या गारपिटीच्या तडाख्यालाही लाजवावा असा हा एप्रिल महिन्यांच्या मध्यातील सनस्ट्रोकचा तब्बल 47 सेल्सीअंश डिग्रीच्या तापमानाचा आकाश फाडून केळीला दिला  जाणार तडाखा केळी उत्पादकांना ठिगळ  लावण्यासाठी दुरापास्त ठरल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंताक्रांत झाला आहे.   चैत्रातच वैशाख वणवा पेटवणारी आग सूर्य  मार्च महिन्यांनंतरही आता एप्रिलच्या मध्यातच ओकू लागला आहे.   केळीला प्रतिकूल ठरणा:या 47 सेल्सिअस डिग्री तापमानाची उष्णलहर कालपासून निर्माण झाल्याने केळीच्या माहेरातच बसणारे चटके केळीची प्रचंड हानी करणारे  ठरले आहेत. केळीमालाची बेभावाने होणारी विक्री पाहता नवती केळीचे क्षेत्र साडेअकरा हजार हेक्टर्पयत येऊन ठेपले आहे.  साडेनऊ हजार हेक्टरमधील जुनारी आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.त्या तरी कांदालागवडीतून होणा:या बागांमध्ये अतिउष्ण वा अतिथंड तापमान सहन करण्याची जी सहनशक्ती असते ती मात्र ऊतीसंवंर्धीत केळीबागांमध्ये राहत नसल्याने  ऊतीसंवंर्धीत केळीबागांचे या प्रतिकूल तापमानात मोठय़ा  प्रमाणात नुकसान आहे होत असल्याचे चित्र आहे.    केळीला किमान 40 सेल्सिअस तापमानाची कमाल मर्यादा आहेत. मात्र, एप्रिलच्या मध्यातच सुरू झालेल्या या प्रतिकूल 47 सेल्सिअस तापमानामुळे केळी बागांची कमालीची अपरिमित हानी होणार आहे. ऊतीसंवंर्धीत केळीसह काही महालक्ष्मी वाणाचे केळीबागांचे घड निसटून पडणे, अपरिपक्व अवस्थेतच केळीचे खोड खाली पडून  अध्यार्तून तुटून पडणे वा थेट मुळांची खोड उखडून पडणे असे दुष्परिणाम सनस्ट्रोकच्या तडाख्यात दिसून येत आहेत.त्यामुळे लागवडीपासून ते खोड फळारूपाला येईपावेतो एखाद्या नवजात शिशुप्रमाणे केळीखोडांची काळजी घेतली तरी या अस्मानी व सुल्तानी संकटामुळे  केळी उत्पादक संकटात सापडला आहे.त्या अनुषंगाने केळी फळपीक विमा योजनेंतर्गत तापमानाच्या निकषाधारे शासनाच्या कृषी विभागाने संबंधित फळपीक विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून निसर्गदत्त न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.                                  (वार्ताहर)