शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे सात ट्रॅक्टर पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 11:31 IST

रात्री ११ वाजता गुन्हा दाखल

ठळक मुद्दे वाहने पळविल्याची तिसरी घटना

जळगाव : महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे पकडलेले तब्बल सात ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालयातून पळविल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी बुधवारी रात्री ११ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या आदेशाने राबविलेल्या मोहिमेत महसूल विभागाने २६ जानेवारीपूर्वी अवैध वाळू वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर पकडून ते जिल्हाधिकारी कार्यालयात लावले होते.यात चार ट्रॅक्टर हे विना क्रमांकाचे होते तर तीन ट्रॅक्टरवर क्रमांक होते. हे ट्रॅक्टर गायब झाल्याचे बुधवारी लक्षात आले.त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार तलाठी सचिन माळी व रमेश ठाकूर वंजारी यांनी स्वतंत्रपणे सात फिर्याद दिल्या. वंजारी यांनी तीन तर माळी यांनी चार फिर्यादी दिल्या.त्यात एम.एच.१९ सी.४५०२, एम.एच.१९ सी.४५५१ व एम.एच.१९ बी.जे.७९७६ या क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर तर विना क्रमांकाचे चार ट्रॅक्टर पळविल्याने अज्ञात व्यक्तींविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात सतत अधिकाऱ्यांचा वावर असतो तसेच उपोषण, मोर्चा, आंदोलनासाठी पोलिसांचाही बंदोबस्त असतो. सतत वर्दळ असतानाही यंत्रणेच्या डोळ्यादेखत ट्रॅक्टर पळवून नेण्याची हिंमत वाळू माफियांनी केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय देखील सुरक्षित नसल्याचे यावरुन स्पष्ट होते.यापूर्वी देखील डंपर व ट्रॅक्टर चोरीचे प्रकार झाल्याने पाणी कुठे तरी मुरत असल्याची चर्चा होत आहे.वाळूमाफियांची वाढती दादागिरीजिल्हाधिकारी कार्यालयातून वाळूचे वाहने पळवून नेण्याची हिमत वाळूमाफियांनी केली आहे. याआधी तहसील कार्यालयाच्या आवारातूनही ट्रॅक्टर पळविण्यात आले होते. तेव्हा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. गेल्या महिन्यातही जिल्हाधिकारी कार्यालयातून डंपर पळविण्यात आल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. वाळू चोरीला आळा बसावा यासाठी प्रशासनाने गुन्हा दाखल न करता दंडात्मक कारवाइचा फार्म्युला अवलंबला होता, त्यानंतर आता पुन्हा गुन्हा दाखल करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. दंडात्मक कारवाईचा आकडा मोठा असल्याने माफियांना गुन्हा दाखल झालेले सोयीचे वाटू लागले आहे.