जळगाव,दि. २ - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने स्थानिक विभागातील अधिकार्यांशी संपर्क साधला असता मुंबई-आग्रा रस्त्यावरील मुंगसे गावाजवळ एमएच १२एफसी ९९२२ हा ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला असल्याची माहिती मिळाली. या प्रकरणात ट्रकचालक मधुकर बर्गे व क्लिनर भगवान जाधव यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिली. त्यानुसार त्यांना पथकाने अटक केली आहे. बनावट अपघात दाखवून साठविला मद्यसाठा या कारवाई दरम्यान पथकाला धक्कादायक माहिती मिळाली आहे. अमरावती येथील एका मद्य निर्माणीमधून मद्याचा साठा घेऊन निघालेला ट्रक एमएच १२/ एफसी ९९२२ मधील काही मद्याच्या बाटल्या या जागेत उतरवून उर्वरित मद्यासह ट्रक रस्त्यालगत उलटा करून बनावट अपघात दाखविण्याची योजना होती. या कटात ट्रकचाचालक, क्लिनर, मोसीन नामक इसम व मुख्य सूत्रधार गुलाम शेख यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव : कानळदा रस्त्यावरील राजारामनगरातील एका घरात विना परवानगी सहा लाख ९१ हजार २00 रुपयांचा साठवून ठेवलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जप्त केला आहे.
या विभागाच्या भरारी पथकातील दुयम निरीक्षक डी.टी. शेवाळे यांना आव्हाणे शिवारातील राजाराम नगरातील एका पांढर्या रंगाच्या घरात विदेशी मद्यसाठा साठविला असल्याची गुप्त माहिती मिळाली. या घरावर छापा टाकला. या कारवाईत पथकाला विना परवाना विदेशी बनावटीचा सहा लाख ९१ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळला. या कारवाईत पथकाने तीन जणांना अटक केली .दोघांना ६ पर्यंत पोलीस कोठडीया तिघांना पथकाने न्या.ए.एम. मानकर यांच्या कोर्टात हजर केले. सरकार पक्षातर्फे अँड.राजेश गवई यांनी सादिक शेख अब्दुल ललित (वय-३४, रा.सिडको, नाशिक) व मधुकर बाबूराव बर्गे (५२, रा.अशोकस्तंभ, नाशिक) या दोघांच्या १४ दिवस पोलीस कोठडीची मागणी केली तर भगवान जाधव ( ६५, रा. आडगाव, नाशिक) यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. न्यायालयाने दोघांना ६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली तर भगवान जाधव याची रवानगी कारागृहात केली. आरोपींतर्फे अँड. सतीश पाटील यांनी काम पाहिले.