शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखाचा दारुचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 12:48 IST

जळगाव : जळगाव व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या नवापाडा, रोहणी व भोईटी येथे सात लाख रुपये किमतीची अवैध दारु व ...

ठळक मुद्देउत्पादन शुल्क उपायुक्तांची कारवाई : ग्रामस्थांनी घातला पथकाला घेराव

जळगाव : जळगाव व मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या नवापाडा, रोहणी व भोईटी येथे सात लाख रुपये किमतीची अवैध दारु व बियरचा साठा पकडण्यात आला. यात दोन जणांना अटक करण्यात आली. सोमवारी रात्री ही धडक कारवाई सुरु झाली ती रात्री उशिरापर्यंत सुरु होती. दरम्यान, कारवाईला विरोध म्हणून गावकऱ्यांनी पथकाला घेरले होते.लाल्या वरा पावरा (नवापाडा) व अर्जून सरदार पावरा (सत्रासेन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमून कारवाईची मोहीम सुरु केली आहे. नाशिक विभागाचे उपायुक्त प्रसाद सुर्वे सोमवारी जळगाव दौऱ्यावर होते. जळगाव व मध्य प्रदेश सिमेवर पंजाब निर्मित अवैध दारुची तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन सुर्वे यांनी जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन सोमवारी सायंकाळी चोपडा तालुक्यातील नवापाडा, रोहीणी व भोईटी येथे धाड टाकली. तेथे लाल्या पावरा याच्या घरात विदेशी दारु व बियरचे ८३ खोके आढळून आले, तर वन विभागाच्या सिमा तपासणी नाक्यावर अर्जून पावरा याच्या ताब्यातील चार चाकी वाहनात २७० लीटर दारु निर्मितीचे रसायन (स्पीरीट) आढळून आले. या साºया मुद्देमालाची किमत ७ लाख १४ हजार ६२० रुपये इतकी आहे.पथकाला कारवाईपासून रोखण्याचा प्रयत्नलाल्या पावरा याच्या घरातून दारुचा साठा जप्त केल्यावर गावातील काही जणांनी पथकाला घेरुन कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. सुर्वे यांनी लागलीच दुसरीकडे थांबलेल्या पथकाला घटनास्थळी बोलावण्यासह धुळे पोलिसांची मदत घेतली. शस्त्रधारी अधिकारी पाहून मद्य तस्कर मागे हटले. तेव्हा दारुचा साठा, वाहन व आरोपींना जळगावला आणण्यात आले. एका जणाला धुळे पथकाच्या ताब्यात देण्यात आले. जळगावचे अधीक्षक एस.एल.आढाव, निरीक्षक संजय कोल्हे, नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक वसंत माळी, महेंद्र सोनार, विकास पाटील, सत्यजीत ठेंगळे, भरत दौंड, वैशाली धनगर यांच्यासह जमादार एच.एन.ब्राम्हणे, रघुनाथ सोनवणे, अमोल पाटील, मुकेश पाटील, सागर देशमुख, विपुल राजपूत, व्ही.बी.परदेशी, राहूल सोनवणे, नंदू नन्नवरे, रवींद्र जंजाळे, नितीन पाटील, शशिकांत पाटील, गिरीश पाटील, नंदू पवार, प्रकाश तायडे व डी.बी.पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.निवडणुकीसाठी विशेष पथकेलोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथकाची निर्मिती केली आहे. जळगाव, चाळीसगाव व भुसावळ येथे तीन निरीक्षक व त्यांच्या दिमतीला दोन भरारी पथके आहेत. पुरनाड नाक्यावर एक भरारी पथक तर चोरवड येथे निवडणुकीपुरता तात्पुरता सिमा तपासणी नाका तयार करण्यात आला आहे. यात २४ तास एक अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती अधीक्षक एस.एल.आढाव यांनी दिली. परराज्यातून येणारे मद्य, अवैध व बनावट मद्य रोखणे व संशयास्पद वाहनांची तपासणी या पथकामार्फत केली जात आहे.