ऑनलाइन लोकमत दहिगाव, जि. जळगाव, दि. 17 - येथून जवळच असलेल्या बोराळे शिवारात सात एकर उसावर शेजारील शेतातील आगीची ठिणगी उडाल्याने सात लाख रुपयांचे नुकसान झाले. बोराळे शिवारातील शेताशेजारी केरकचरा पेटविल्याने त्याची ठिणगी ऊसावर पडल्याने मरतड पाटील यांचा पाच एकर तर प्रभाकर पाटील यांचा दोन एकरमधील ऊस जळून सात लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत पीक संरक्षण संस्थेकडे तक्रार करण्यात आली.
आगीमध्ये सात लाखाचा ऊस जळून खाक
By admin | Updated: May 17, 2017 18:31 IST