शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

साडे सात लाखाचे खाद्य तेल लांबविणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

जळगाव : महामार्गावर लावलेल्या ट्रक व त्यातील साडे सात लाख रुपये किंमतीचे खाद्य तेल लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या ...

जळगाव : महामार्गावर लावलेल्या ट्रक व त्यातील साडे सात लाख रुपये किंमतीचे खाद्य तेल लांबविणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला असून इद्रीस मोहम्मद कालू (३८), मोहम्मद बशीर शेख (३५) व शोएब हुसेन जभा (३७) सर्व रा.गोध्रा, गुजरात या तिघांना अटक केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी वरणगाव येथे नागपूर महामार्गावर खाद्य तेल भरलेला ट्रक (क्र.एम.एच.१९सी.वाय.६००२) लावलेला होता. त्यात ७ लाख ३७ हजार ३४५ रुपये किंमतीचा तेलाचा साठा होता. हा ट्रक चोरट्यांनी मध्यरात्री लांबविला होता. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा व वरणगाव पोलिसांना दिले होते. दोन्ही यंत्रणेकडून तपास सुरु असतानाच ट्रक व तेल चोरणारे संशयित शिरपुर-चोपडा रस्त्यावर आणखी गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील नाईक, सहायक फौजदार राजेंद्र का.पाटील, अशरफ शेख, दादाभाऊ पाटील व दीपक पाटील यांचे पथक रविवारी सकाळी रवाना केले. या पथकाने सापळा रचून वर्णन व गुप्त माहितीच्या आधारावर तिघांना ताब्यात घेतले. त्यांचे आधारकार्ड व इतर कागदपत्रांची तपासणी केल्यावर हे गुजरातचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी वरणगाव येथून ट्रक व तेल चोरल्याची कबुली देवून आणखी असाच गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे मान्य केले. दरम्यान, तिघांना वरणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आता या गुन्ह्याचा पुढील तपास वरणगावचे सहायक निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहे.