शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

खान्देशात अनेक मंडळांकडून ‘श्रीं’ना निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:18 IST

जळगावात चिनावल व साकेगावात विसर्जन : नंदुरबारला मिरवणुकीवर जलाभिषेक

ठळक मुद्देधुळ्यात ९० ‘श्रीं’चे विसर्जननंदुरबार शहरात १४ मोठ्या तालीम संघांतर्फे मिरवणूकचिनावल येथे मिरवणुकीत पोलीस सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव /धुळे/ नंदुरबार : खान्देशात गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी गुरुवारी अनेक सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरयाऽऽ..पुढच्या वर्षी लवकर याऽ..अशा घोषणा देत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. नंदुरबारला मिरवणुकांवर वरुणराजाने जलाभिषेक केल्याने उत्साहात भर पडली होती.धुळेजिल्ह्यात दोंडाईचा येथील ३३, साक्री तालुक्यातील निजामपूर येथे १०, शिरपूर २५, शिंदखेडा १०, नरडाणा ४, शिरपूर तालुका १, थाळनेर ५, धुळे तालुका ५, साक्री २, सोनगीर ४, धुळे १ असे सार्वजनिक गणेश मंडळांचे एकूण ८९ व एक गाव एक गणपती १ अशा एकूण ९० ‘श्रीं’चे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत अभूतपूर्व उत्साह पाहावयास मिळाला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. विसर्जन सोहळ्यात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी सर्वच ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. नुकत्याच झालेल्या पावसाने भरलेल्या विविध बंधारे, तलावांसह नदीवर मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.नंदुरबारजिल्हाभरात दुसºया टप्प्यातील गणेश विसर्जन उत्साहात व शांततेत झाले. एकूण २२७ मंडळांतर्फे विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. नंदुरबारात रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. मिरवणुकांदरम्यान सायंकाळी नंदुरबारसह काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने उत्साह संचारला होता.जिल्ह्यात दुसºया टप्प्यातील अर्थात सात दिवसांच्या गणेश मूर्ती विसर्जन मिरवणुकांचा उत्साह सकाळपासूनच होता. अनेक लहान- मोठ्या मंडळांनी सकाळी १० वाजेपासूनच मिरवणुकांना सुरुवात केली होती. मोठ्या मंडळांनी दुपारी तीननंतर मिरवणुका काढल्या.नंदुरबार शहरात १४ मोठ्या तालीम संघांतर्फे मुख्य मिरवणूक मार्गावरून मिरवणुका निघाल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या मिरवणुका सुरू होत्या. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नंदुरबारात १७ सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर मिरवणुकांवर होती.प्रकाशा येथे तापी पात्रात मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती. नावाडीदेखील तैनात करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरातील अनेक मंडळे, घरगुती गणपती मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी येत होत्या. पुलावरून मूर्ती विसर्जनासाठी ठिकठिकाणी मोठ्या लाइटांची व्यवस्था करण्यात आली होती.जळगाव जिल्ह्यात चिनावल (ता. रावेर) आणि साकेगाव (ता. भुसावळ) येथे गणेश विसर्जन करण्यात आले. चिनावल येथे तर विसर्जन मिरवणुकीत स्वत: पोलीसच सहभागी झाले होते. यामुळे वातावरण आणखीनच हलके-फुलके झाले होते. तसेच पोलिसांच्या सहभागामुळे तरूणांचाही उत्साह वाढला होता़ मिरवणुकीतील सहभागाने पोलिसांनाही थोडा विरंगुळा मिळाला़