शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर, आळंदी, सासवड येथे मुक्ताईनगर येथून प्रतिनिधी पाठवून निवृत्तीनाथ, ज्ञानदादा, सोपानदादा तिन्ही भावांना मुक्ताईने बांधली राखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:37 IST

बहिण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील हे रक्षाबंधन अखंडपणे पार पाडले जात आहे.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : बहीण-भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजेच रक्षाबंधन हा नारळी पौर्णिमा या शुभमुहूर्तावर बहिण संत मुक्ताबाईकडून बंधू संत निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वर, ज्ञानेश्वर माऊली आळंदी, संत सोपानकाका सासवड येथे श्री संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथून पाठविलेली राखी बांधण्यात आली. संत परंपरेतील हे रक्षाबंधन अखंडपणे पार पाडले जात आहे.राखी पौर्णिमेच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधण्याचा पारंपरिक उत्सव असल्याने श्री संत मुक्ताबाई संस्थान श्रीक्षेत्र कोथळी- मुक्ताईनगर संस्थानाने आजही ही परंपरा जोपासली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बहीण संत मुक्ताईकडून दादा संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव तिन्ही बंधंूच्या गावी मुक्ताई संस्थान कोथळीचे अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी सोमवारी राखीपौर्णिमेच्या सणाला खास प्रतिनिधी पाठवून कोरोना काळातसुध्दा परंपरा कायम राखली.त्र्यंबकेश्वर येथे संदीप पाटील यांनी सपत्नीक जेष्ठ बंधू श्री संत निवृत्तीनाथांकडे राखी प्रदान केली. संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान अध्यक्ष पवन भुतडा, पुजारी ह.भ.प.जयंत् ामहाराज गोसावी, विश्वस्त ह.भ.प.संजयनाना महाराज यांची उपस्थिती होती.आळंदी येथे आज सकाळी माऊली ज्ञानदादांना मुक्ताईकडील राखी, रुमाल, टोपी ह.भ.प. विचारसागर महाराज लाहूडकर यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी प्रमुख अ‍ॅड.विकास ढगे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्याकडे सोपविली.मुक्ताईचे लहान बंधू सोपानदादांना सासवड येथे जावून विजय महाले यांनी मुक्ताईकडील राखी बांधली. यावेळी पुजारी हिरूकाका गोसावी चोपदार हरिभाऊ यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमMuktainagarमुक्ताईनगर