शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

‘एमआरपी’पेक्षा जादा दराने विक्री

By admin | Updated: January 25, 2017 01:11 IST

मॉलमध्ये किंमत कमी : रेल्वे स्टेशनवर खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट

जळगाव : व्यापार व व्यावसायातील वाढती स्पर्धा आणि ग्राहकांमध्ये असलेली जनजागृती यामुळे शहरातील शॉपिंग मॉलमध्ये बहुतांश वस्तू या एमआरपीपेक्षा कमी किंमतीत विक्री होत आहेत. बस स्टॅण्ड आहे त्या किंमतीने तर रेल्वे स्टेशनवर मात्र जादा दराने विक्री होत असल्याचे‘लोकमत’ने केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये उघड झाले.स्टींग ऑपरेशन कशासाठी ?ग्राहकाच्या हक्काचे जतन करण्यासाठी ग्राहक पंचायतीमार्फत मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात येत असते. एमआरपीपेक्षा जादा दराने वस्तुची विक्री होत असल्यास त्याबाबत ग्राहक मंचमध्ये संबधित विक्रेत्याविरूद्ध तक्रार करण्याचा हक्क ग्राहकाला आहे. मात्र तरीदेखील काही ठिकाणी वस्तुवरील एमआरपीपेक्षा जादा दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी असल्याने नेमकी स्थिती काय? याची पडताळणी करण्यासाठी ‘लोकमत’ मार्फत स्टींग ऑपरेशन करण्यात आले.शॉपिंग मॉलमध्ये सूट‘लोकमत प्रतिनिधी’ दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास शिरसोली नाक्यावरील एका शॉपिंग मॉलमध्ये खरेदीसाठी दाखल झाला. या ठिकाणी प्रतिनिधीने 100 ग्रॅम किंमतीचे बिस्कीटचे काही पुडे खरेदी केले. त्यावर 20 रुपये एमआरपी प्रिंट होती. त्यानंतर प्रतिनिधीने आफ्टर शेव्हींग लोशनची खरेदी केली. त्यावर 125 रुपये एमआरपी होती. मॉलमधील काऊंटर चालकाने बिस्कीट पुडय़ाचे 17 रुपये प्रमाणे 34 तर आफ्टर शेव्हींग लोशनचे 110  रुपये बिलाची आकारणी केली.यात शॉपिंग मॉलकडून 21 रुपयांची सूट देण्यात आली. यासोबतच शॉपिंग मॉलमध्ये ऑफर सुरु असल्याने विंटर क्रीम देखील मोफत दिली. एस.टी.स्टॅडवर एमआरपीनुसार आकारणीप्रतिनिधी दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात दाखल झाला. याठिकाणी एस.टी.स्टॉलवर असलेल्या खाद्यपर्दार्थाच्या किंमतीची विचारणा केली. स्टॉलवरील शेगदाणा चिक्कीची खरेदी केली. 12 रुपये एमआरपीची चिक्की 10 रुपयांमध्ये मिळाली. शुद्ध पाण्याच्या बॉटलीची एमआरपीनुसार 20 रुपयांची रक्कम आकारली. त्यानंतर प्रतिनिधी एस.टी.कॅन्टीनमध्ये दाखल झाला. या ठिकाणी बिस्कीट पुडे व पाण्याच्या बॉटलच्या किंमतीची विचारणा केली. कॅन्टीनमालकाने एमआरपीनुसार किंमतीची आकारणी केली.खाद्य पदार्थातील हानीकारक घटक, भेसळ याबाबत तक्रार करायची असल्यास ग्राहकांना अन्न व औषध विभाग, जळगाव. फोन 0257/ 2217476 या ठिकाणी तक्रार करता येईल.जिल्हास्तरावर ग्राहकांच्या तक्रारीनुसार कारवाई न झाल्यास अन्न व औषध विभाग, मुंबई. फोन नं. 022/ 26592756 या ठिकाणी ग्राहकांना तक्रार करता येईल.रेल्वे स्टेशनवर जादा दराने विक्री़़़ ‘लोकमत’प्रतिनिधी रेल्वे स्टेशनवर दाखल झाला. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर असलेल्या रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्याकडे 300 मिली शितपेयाच्या बॉटलची मागणी केली. विक्रेत्याने एक रुपये जादा आकारणी केली. त्याबाबत विचारणा केली असता शितपेय कुलींगसाठी एक रुपया जादा घेण्यात येत असल्याचे समर्थन त्याने केले. त्यानंतर प्रतिनिधी दुस:या स्टॉलवर चौकशीसाठी पोहचला. या ठिकाणी दोन बिस्कीट पुडे घेतल्यानंतर एमआरपीपेक्षा एक रुपये जादा आकारणी विक्रेत्याने केली.