शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

लांबविलेल्या दुचाकींची फक्त 100 रुपयात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2017 00:35 IST

जळगाव : दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या समाधान गोकुळ सपकाळे या चोरटय़ास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे शिवाजीनगरातून अटक केली.

जळगाव : दुचाकी चोरीत अट्टल असलेल्या समाधान गोकुळ सपकाळे (वय 28 रा.हडपसर, पुणे, मुळ रा.फुपणी,ता. जळगाव) या चोरटय़ास जळगाव शहर पोलिसांनी गुरुवारी पहाटे शिवाजीनगरातून अटक केली. त्याने आतार्पयत सुमारे 25 दुचाकी चोरल्या असून त्याची फक्त 100 ते 200 रुपयात विक्री केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.नवी पेठेतील राठी ट्रेडर्स या दुकानाजवळून 10 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता लक्ष्मीकांत योगेश राठी यांच्या मालकीची 40 हजार रुपये किमतीची दुचाकी (क्र.एम.एच.19 बी.आर.1199) चोरी झाली होती. शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासले असता पुणे कारागृहातून एक अट्टल चोरटा बाहेर आला आहे व तो सध्या जळगाव जिल्ह्यात वावरत असल्याची माहिती कॉन्स्टेबल प्रितम पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी गुन्हे पथकाचे सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, सुनील पाटील, दुष्यंत खैरनार, संजय शेलार व अमोल विसपुते यांचे पथक तयार करुन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. सपकाळे हा शिवाजीनगरात नातेवाईकाकडे आहे व त्याच्याजवळ राठी यांच्या मालकीची दुचाकी असल्याचे समजताच पथकाने पहाटे अडीच वाजता त्याला नातेवाईकाच्या घरी घेरले. पोलिसांचे मोबाईल चोरलेसपकाळे याच्यावर हडपसर, पुणे येथे दुचाकीचे चोरीचे आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. तेथील पोलिसांच्या ताब्यात असताना गुन्हे पथकाच्या कर्मचा:यांचे मोबाईल व कपाटातील साहित्यही त्याने चोरले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.