शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विषय समिती सभापतींची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 00:53 IST

चाळीसगाव/ पाचोरा : नगरपालिकेच्या विषय समिती सभापतींची निवड 4 रोजी झाली. या निवडीत चाळीसगाव येथे भाजपाचे तर पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले.

चाळीसगाव/ पाचोरा : नगरपालिकेच्या  विषय समिती सभापतींची निवड 4 रोजी झाली. या निवडीत चाळीसगाव येथे भाजपाचे तर पाचोरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले. स्थायी समिती सभापतीपदी पदसिद्ध म्हणून नगराध्यक्षांचीच निवड झाली आहे. चाळीसगाव व पाचोरा या दोन ठिकाणी अनुक्रमे भाजपा आणि शिवसेनेचीच सत्ता आहे. चाळीसगावात 6 पैकी भाजपाचे 3, शिवसेनेचे 2 व 1 अपक्ष असे सभापती झाले आहेत. पाचो:यात समिती सभापती निवडीत  अंतर्गत तडजोडीतून राष्ट्रवादीला अधिक संधी मिळू शकली. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीने छुपी साथ दिल्याने आता राष्ट्रवादीला तशीच साथ सेनेची मिळाली.  6 पैकी 3 सभापती राष्ट्रवादीचे असून एक सेनेचा व एक जनाधार आघाडीचा आहे.  चाळीसगाव  नगरपरिषदेच्या  सभागृहात 4 रोजी विषय समिती सभापतींची निवडणूक तहसीदलार कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत सभापतींची निवड बिनविरोध करण्यात आली. सभेला सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी श्रीकृष्ण भालसिंग, कार्यालय प्रमुख विजय खरात आदी उपस्थित होते. पाचोरा नगरपरिषदेच्या  विविध विषय समितीच्या सभापतींची शनिवारी जाहीर करण्यात आली. 9 जानेवारी रोजी झालेल्या विशेष सभेनुसार स्थायी समिती सदस्य म्हणून राम ग्यानचंद केसवाणी व संजय ओंकार वाघ यांना नामनिर्देशित करण्यात आलेले असून उर्वरित सहा समित्यांवर प्रत्येकी एकच नामनिर्देशन प्राप्त झाल्याने विविध समित्या व त्यांच्या सभापतींची घोषणा तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी खालीलप्रमाणे केली.यावेळी नगराध्यक्ष संजय गोहील, मुख्याधिकारी किरण देशमुख व सर्व नगरसेवक उपस्थित होते. (वार्ताहर)समिती व सभापती..चाळीसगाव: सा.बां. समिती-  विजया प्रकाश पवार, शिक्षण - शेखर कन्हैयालाल बजाज, स्वच्छता वैद्यकीय व सार्व. आरोग्य - घृष्णेश्वर रामकृष्ण पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण- शामलाल वामनराव कुमावत, महिला व बालकल्याण- विजया भिकन पवार, नियोजन व विकास- आशाबाई रमेश चव्हाण. स्थायी समिती - आशालता विश्वास चव्हाण, पदसिध्द सदस्य- आशाबाई रमेश चव्हाण, सदस्य राजेंद्र चौधरी, राजीव देशमुख, सुरेश स्वार, विजया स्वार,  शेखर बजाज,  घृष्णेश्वर पाटील, विजया पवार. पाचोरा: सा.बां. समिती- सुचेता दिलीप वाघ, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य. - विकास संतोष पाटील, स्वच्छता, वैद्यकीय व सार्व. आरोग्य - प्रियंका वाल्मीक पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण -वासुदेव भिवसन माळी, नियोजन आणि विकास- शरद बाळकृष्ण पाटे, महिला व बालकल्याण - सईदाबी शब्बीर खान. स्थायी समितीचे पदसिध्द सभापती नगराध्यक्ष संजय गोहील तर उपसभापती शरद बाळकृष्ण पाटे.