शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
4
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
5
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
6
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
7
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
8
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
9
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
10
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
11
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
12
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
13
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
14
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
15
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
16
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
17
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
18
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
19
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

पं.स.सभापती-उपसभापती निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2017 00:05 IST

अमळनेर/चोपडा/पारोळा : निवड होताच कार्यकत्र्यानी केला जल्लोष, नवनिर्वाचितांची मिरवणूक

अमळनेर/चोपडा/पारोळा : अनेर-बोरी परिसरात आज पंचायत समिती सभापती-उपसभापतींची निवड झाली. अमळनेरात निवड बिनविरोध झाली. तर पारोळा व चोपडय़ात हात उंचावून मतदान घेण्यात आले. अमळनेरात भाजपाचा, पारोळ्यात राष्ट्रवादीचा तर चोपडय़ात युतीचा ङोंडा पंचायत समितीवर फडकला आहे.अमळनेर  येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या मांडळ गणातील वजाबाई नामदेव भिल  (जवखेडा) यांची तर उपसभापतीपदी शिरूड गणातील त्रिवेणीबाई शिवाजी पाटील (शिरूड) यांची आज  बिनविरोध निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड होते.मंगळवारी दुपारी पंचायत समितीच्या पू. साने गुरुजी सभागृहात सभापती व उपसभापती निवडीसाठी नवनियुक्त सदस्यांची बैठक  झाली.  सभापतीपदासाठी वजाबाई भिल यांचा  तर उपसभापतीपदासाठी  त्रिवेणीबाई पाटील यांचा प्रत्येकी एक, एक अर्ज आल्याने सभापती-उपसभापतीची निवड बिनविरोध करण्यात आली. या वेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार राजेश अमृतकार, गटविकासाधिकारी अशोक पटाईत, सहायक गटविकासाधिकरी बी. डी. गोसावी, कक्षाधिकारी किशोर पाटील, राजेंद्र सोनवणे, देवेंद्र पाटील उपस्थित होते.या वेळी पंचायत समिती सदस्य प्रवीण वसंत पाटील, कविता प्रफुल्ल पाटील, निवृत्ती पुंजू बागुल, विनोद नामदेव जाधव, रेखा नाटेश्वर पाटील, भिकेश पावभा पाटील उपस्थित होते. आमदार स्मिता वाघ, माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जि.प.चे माजी सदस्य संदीप पाटील आदी पदाधिका:यांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापती यांचे स्वागत केले.पारोळा  येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी  राष्ट्रवादीच्या  सुनंदा पांडुरंग पाटील यांची व  उपसभापतीपदी अशोक नगराज पाटील या दोघांची प्रत्येकी  एक मताने निवड झाली.  त्यामुळे पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा ङोंडा फडकला आहे.तहसीलदार वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11 वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया झाली. सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून  शिरसमणी गणाच्या सुनंदा पांडुरंग पाटील (टिटवी) व उपसभापतीपदासाठी शिरसोदे गणाचे अशोक नगराज पाटील (अंबापिंप्री) यांनी  उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेकडून सभापतीपदासाठी छायाबाई जितेंद्र पाटील (इंधवे) व उपसभापतीपदासाठी प्रमोद जाधव (शिरसोदे) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी हात उंचावून मतदान घेतले. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनंदा पाटील यांना  चार तर सेनेच्या छायाबाई पाटील यांना तीन मते पडली, त्यांचा एक मताने पराभव झाला. त्याप्रकारे उपसभापतीसाठी राष्ट्रवादीच्या अशोक पाटील यांना चार तर सेनेच्या प्रमोद जाधव यांना तीन मते पडली. एक मताने अशोक पाटील उपसभापतीपदी विजयी घोषित करण्यात आले. गटविकास अधिकारी आर.के.गिरासे यांनी सभापतीपदी सुनंदा पाटील यांचे व उपसभापतीपदी  अशोक पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर करताच,  राष्ट्रवादीच्या कार्यकत्र्यानी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.  सभापती-उपसभापती यांना प्रत्येकी सव्वा-सव्वा वर्ष संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. आमदार डॉ. सतीश पाटील, माजी खासदार अॅड. वसंतराव मोरे, जि.प.सदस्य रोहन पाटील, हिंमत पाटील आदींनी नवनिर्वाचित सभापती, उपसभापती यांचे स्वागत केले. या नवनिर्वाचितांची विजयी मिरवणूक  काढण्यात आली. या वेळी मनोराज पाटील, राजेंद्र बाबुराव पाटील, डॉ. शांताराम पाटील, तालुकाध्यक्ष बाळू पाटील, मुकेश पाटील, गोविंद नगराज पाटील, ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील, माजी जि.प.सदस्य पांडुरंग पाटील, कैलास पाटील, माजी सभापती चंद्रकांत पाटील, जिजाबराव पाटील  आदी हजर होते.    चोपडा  येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाचे विरवाडे गणातील आत्माराम म्हाळके (विरवाडे) यांची तर उपसभापतीपदी  शिवसेनेचे  घोडगाव गणातील मच्छिंद्र  वासुदेव पाटील (वढोदा) यांची निवड करण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार दीपक गिरासे यांनी काम पाहिले. सभापतीपदासाठी भाजपाचे आत्माराम म्हाळके यांनी तर उपसभापतीसाठी शिवसेनेचे मच्छिंद्र वासुदेव पाटील यांनी अर्ज दाखल केले. तर राष्ट्रवादीकडून सभापतीपदासाठी कल्पना यशवंत पाटील आणि उपसभापतीपदासाठी कल्पना दिनेश पाटील यांनी अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजता पंचायत समितीच्या सभागृहात  हात उंच करून मतदान घेण्यात आले. त्यात सभापतीपदासाठी आत्माराम म्हाळके व उपसभापतीपदासाठी मच्छिंद्र पाटील यांना सात जणांनी हात उंच करून मतदान केले. तर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांना पाच जणांनी मतदान केले. त्यामुळे सभापतीपदी आत्माराम म्हाळके तर उपसभापतीपदी मच्छिंद्र पाटील यांची निवड झाल्याचे जाहीर केले. या वेळी सभापती, उपसभापती यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. सहाय्यक पीठासीन अधिकारी म्हणून बीडीओ ए. जे. तडवी, नायब तहसीलदार डॉ. स्वप्नील सोनवणे यांनी सहकार्य केले.            (वार्ताहर)