पाल, ता.रावेर, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या लगडाआंबा कंपार्टमेंट नंबर १२२ वनक्षेत्रात वनविभागाने ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.रेमसिंग शेरता भिलाला (वय २१, रा.ऊसमळी, ता. यावल) व राणा छगन बारेला (वय २१, रा.चिचोंली, ता.यावल) अशी संशयितांची नावे आहेत.वनविभागाचे पथक जामन्या, लगडाआंबा क्षेत्रात गस्त घालत असताना संशयितांकडे हे सागवानी लाकूड आढळले. वनक्षेत्रपाल अक्षय म्हैत्रे, ए.डी.चौधरी, वनपाल डी.एम.जाधव, वनपाल के.बी.पवार, वनरक्षक नवल चव्हाण, वनरक्षक अय्यूब तडवी, वनरक्षक होकाऱ्या बारेला, वनरक्षक प्रकाश बारेला, वनरक्षक लेदा पावरा, वनमजूर अकबर तडवी, अमोल चव्हाण, युसूफखान अकबर तडवी यांनी ही कारवाई केली.दोघा संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लगडाआंबा येथे सागवानी लाकूड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 15:19 IST
लगडाआंबा कंपार्टमेंट नंबर १२२ वनक्षेत्रात वनविभागाने ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.
लगडाआंबा येथे सागवानी लाकूड जप्त
ठळक मुद्देवनविभागाच्या गस्तीपथकाची कारवाईदोन जण वनविभागाच्या ताब्यात