धुळे : जिल्ह्यात बोगस आदिवासी जातीचे दाखले मिरवीत असले तरी ख:या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळींवर मात्र अन्याय होत आह़े त्यामुळे प्रशासनाने बोगस आदिवासी शोधावे व ख:या आदिवासी कोळी बांधवांना जातीचे दाखले देऊन न्याय द्यावा, अन्यथा मंत्रालयावर पदयात्रा काढावी लागेल, असा इशारा आदिवासी वाल्मीकलव्य सेनेचे प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी दिला़ 70 किमी पायपीट करून त्यांनी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांना निवेदन सादर करून वस्तुस्थिती मांडली़ पदयात्रेला सुरुवात अनेक वर्षापासून आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला अनुसूचित जातींच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात आह़े तर दुसरीकडे बोगस आदिवासींना न्याय दिला जात आह़े त्यामुळे बोगस आदिवासींचा शोध घेऊन प्रशासनाने ख:या आदिवासींना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिंदखेडा तालुक्यातील साहूर येथून आदिवासी वाल्मीकलव्य सेनेने दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गाठल़े मंगळवारी पदयात्रेला सुरुवात झाली होती़ अशा आहेत मागण्या़़़ आदिवासींच्या या संघर्ष पदयात्रेला कमलाबाई कन्याशाळेजवळ पोलिसांनी थांबविल़े त्यानंतर 15 पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल़े या वेळी जिल्हाधिका:यांशी चर्चा करताना शानाभाऊ सोनवणे म्हणाले की, टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचे दाखले व वैधता प्रमाणपत्र इतर आदिवासींप्रमाणे सोप्या पद्धतीने मिळावेत़ 23 जुलै 2010 ला सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जमाती कल्याण समितीने जो अहवाल सादर केला आहे, तो तत्काळ लागू करावा, केंद्रात जातपडताळणी समिती नाही, म्हणून आदिवासींना त्रासदायक ठरणारी जात पडताळणी समिती तत्काळ रद्द करावी, त्याऐवजी अतिरिक्त जिल्हाधिकारी या दर्जाच्या स्तरावर स्वतंत्र अधिकारी उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात यावे, संविधानातील हक्क मिळावेत, आदिवासी कोळींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवणा:यांवर गुन्हे दाखल करा, तलाठींमार्फत टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळींच्या जमिनीवर 1966 चे कलम 36 व 36 अ नुसार नोंद घेण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे तंतोतंत पालन करण्यात यावे, राज्यातील काही गावांमध्ये 90 टक्के टोकरे कोळी, महादेव कोळी व मल्हार कोळी जमात असताना त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत, त्या त्वरित मिळाव्यात, शासन योजनांचा लाभ आदिवासी कोळी समाजाच्या विद्याथ्र्याना सहजपणे मिळावा आणि 10 ऑगस्ट 2009 ला काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी अमानुष लाठीमार व गोळीबार केला होता, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली़ एकाच राज्यात आदिवासींना दोन कायदे पाळावे लागत आहेत, असेही ते म्हणाल़े समाजबांधवांना मार्गदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयात सोडताना संघटनेच्या पदाधिका:यांची पोलिसांशी किरकोळ शाब्दिक चकमक झाली़ परंतु अखेर 15 जणांना सोडण्यात आल़े जिल्हाधिका:यांना निवेदन सादर केल्यानंतर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करण्यात आल़े या वेळी शानाभाऊ सोनवणे यांनी जिल्हाधिका:यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट केल़े त्यानंतर संघर्ष पदयात्रेचा समारोप करण्यात आला़ या संघर्ष यात्रेत शानाभाऊ सोनवणे यांच्यासह मोहन शंखपाळ, पवन सोनवणे, संदीप तायडे, वासुदेव चित्ते, हिलाल वाघ, संजय मगरे, दादाभाऊ बि:हाडे, किशोर बागुल, प्रदीप नवसार, मोतीलाल सोनवणे, भास्कर कुवर, पीतांबर देवरे, विनायक कोळी, भैया जाधव, नितीन आखडमल, इंदूताई सोनीस, नामदेव येळवे, मोहन कोळी, ज्ञानेश्वर कोळी, राजू कोळी, वानुबाई शिरसाठ आदी उपस्थित होत़े या पाश्र्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता़
... तर बोगस आदिवासी शोधाच!
By admin | Updated: December 17, 2015 00:18 IST