शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दारुच्या ६०० गोदामांना लावले सील

By admin | Updated: April 2, 2017 00:41 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी : शहरातील ४० दुकाने पुन्हा सुरूहोणार; महामार्गावर शुकशुकाट

जळगाव : सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्यमार्गावरील दारुची दुकाने, परमीट रुम व बियर बार १ एप्रिलपासून बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी जिल्ह्यातील ६०० दुकाने व बारमधील साठ्याचे मोजमाप करुन त्याचे गोदाम सील केले. या व्यावसायिकांना बंदची नोटीस देऊन दुकानांचा पंचनामा करण्यात आला.मद्याच्या नशेत वाहने चालविल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढून त्यात बळी जाणाºयांची संख्या अधिक असल्याचे मत नोंदवून सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्टÑीय महामार्गाला लागून असलेल्या ५०० मीटरच्या आत असलेले दारू दुकाने, परमीट रुम व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ३१ मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांनी १ एप्रिल रोजी दुकाने न उघडण्याच्या सूचना व्यावसायिकांना दिल्या होत्या. शहरातील ४० दुकानांना दिलासाजळगाव महानगरपालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी वर्ग केलेल्या सहा रस्त्यांना शासनाने अवर्गीकृत करण्यास मान्यता दिल्याने त्यामुळे मनपा हद्दीत राज्यमार्गाला लागून असलेल्या ४० हॉटेल व दुकानांना दिलासा मिळाला आहे. नव्या आदेशानुसार २०.५२० किलोमीटरचे हे रस्ते येतात. या रस्त्यावरील दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश द्यावेत यासाठी वाईन शॉपवर झुंबडन्यायालयाच्या आदेशाने ५०० मीटरच्या आत असलेले दारुचे दुकाने व हॉटेल बंद झाल्याने शनिवारी संध्याकाळी गणेश कॉलनी, नवी पेठ व पोलन पेठ या भागात वाईन शॉपवर दारु खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली होती. गणेश कॉलनीत तर रांगा लागल्या होत्या व रेटारेटी झाली होती. तर संध्याकाळी शहरातील बारवरही ग्राहकांची गर्दी झाली होती. म्हणून बंद राहिल्या शहरातील हॉटेल्ससर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ५०० मीटरच्या आत असलेल्या हॉटेल्स व बार बंद होते तर राज्य शासनाने शुक्रवारी राज्यपालांच्या आदेशाने काढलेल्या अधिसूचनेमुळे स्टेशन रोड व जुन्या राज्यमार्गाला लागून असलेल्या अनेक हॉटेल्स व बार बंद होते. जिल्हा प्रशासनाने या हॉटेल्सचे नूतनीकरण केलेले नाही, त्यामुळे शनिवारी या हॉटेल बंद होत्या अशी माहिती एका हॉटेल व्यावसायिकाने दिली.