शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

विषयतज्ज्ञांनी भरविली हजेरीत ‘शाळा’

By admin | Updated: May 24, 2017 12:48 IST

विषय तज्ज्ञ, गट शिक्षणाधिका:यांकडून दिशाभूल : जिल्ह्यात 78 विषय तज्ज्ञ

 ऑनलाईन लोकमत विशेष /अजय पाटील  

जळगाव, दि.24- शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या विषयतज्ज्ञांकडून 15 अजिर्त सुटय़ा न घेतल्याचे दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रकार सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. 
शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक उपक्रमांतर्गत विद्याथ्र्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, शाळांना भेटी देऊन शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेची माहिती शिक्षण विभागाकडे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विषयतज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 78 विषय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. विषय तज्ज्ञांची नेमणूक ही कंत्राटी पध्दतीने करण्यात आली असून, डाएटच्या माध्यमातून विषयतज्ज्ञांचे वेतन अदा केले जात असते.  
हजेरी पत्रकावर दाखविली जाते खोटी हजेरी 
सहा महिन्यांसाठी नियुक्ती विषय तज्ज्ञांना 15 दिवसाच्या अर्जित सुटय़ा मंजूर आहेत. त्यात 15 दिवसाच्या वर सुट्टी घेतल्यास वेतनातून कपात केली जात आहे. मात्र अर्जित केलेल्या 15 दिवसांपैकी काही सुटय़ा शिल्लक असल्यास त्या सुटय़ांचे वेतनदेखील मिळत असते. मात्र अनेक विषय तज्ज्ञांकडून 15 दिवसाच्या सुटय़ा घेतल्यावर सुध्दा हजेरीपत्रकावर  15 दिवस सुट्टी न घेतल्याची माहिती दिली जात आहे. 15 दिवसासाठी मिळणारे 13 हजार 961 रुपये विषयतज्ज्ञांना प्राप्त होत आहे. सहा महिन्याचा काळात विषय तज्ज्ञ एकही सुट्टी घेत नाहीत का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
गटशिक्षणाधिका:यांसोबत संगनमत 
विषय तज्ज्ञांची हजेरी पुस्तक हे तालुक्याचा ठिकाणी असलेल्या गट साधन केंद्रावर उपलब्ध करून दिले आहे. या ठिकाणी विषय तज्ज्ञ आपली हजेरीची माहिती देत असतात. त्यानंतर गट शिक्षणाधिका:यांकडून या हजेरीपत्राची तपासणी करून वेतनासाठी डाएट च्या प्राचार्याकडे दिली जाते. डाएट प्राचार्यानी हजेरीपत्रावर सही केल्यानंतर विषय तज्ज्ञांचे वेतन केले जात असते. गट शिक्षणाधिका:यांसोबत संगनमत करीत हा प्रकार सुरु असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.
शिक्षण विभाग, डाएट कडून टोलवाटोलवी
प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी विषय तज्ज्ञांच्या वेतनाची जबाबदारी डाएट कडे असल्याचे सांगितले. तर डाएटचे प्राचार्य अनिल सोनार यांनी हजेरी पत्राची संपूर्ण माहिती ही गट शिक्षणाधिका:यांकडून येत असल्याचे सांगितले. तसेच गट शिक्षणाधिकारीच विषय तज्ज्ञांच्या हजेरीची शहानिशा करतात. त्यांनी पाठविलेल्या माहितीच्या आधारावरच विषय तज्ज्ञांचे वेतन दिले जात असल्याची माहिती प्राचार्य सोनार यांनी दिली.