शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसची वीज खांबाला धडक

By admin | Updated: January 31, 2017 00:18 IST

जामनेर : 10 विद्यार्थी जखमी, खासगी रुग्णालयात उपचार

जामनेर : शाळा प्रशासन आणि संबंधित चालकाच्या दुर्लक्षामुळे लहान विद्याथ्र्याना घेऊन येणारी जैन इंटरनॅशनल स्कूलची मिनीबस विजेच्या खांब्याला धडकून आठ ते 10 विद्यार्थी जखमी झाले. ही घटना 30 रोजी रोजी सकाळी नऊ वाजता घडली.  शहरात चार ते पाच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा आहेत. त्यामध्ये तालुक्यातील शेकडोच्या संख्येमध्ये लहान मुले येतात. त्यांच्याकडून घरून आणणे आणि त्या सर्वाना घरी पोहोचविण्यासाठी वेगळी फी वसूल केली जाते. जैन इंटरनॅशनल स्कूलची मिनीबस शहरातील पाचोरा रस्त्यावरील मथाईनगरमध्ये आली. तेव्हा बसने वीज खांबाला धडक दिली. त्यात आठ ते 10 विद्यार्थी जखमी झाले. यात केशव कांतीलाल चौधरी, तुषार चौधरी, जयेश गोरे, अभिजित, ऋषिकेश आणि भावेश आदी विद्याथ्र्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे संबंधित शाळेतून विद्याथ्र्याची पूर्ण नावे, गाव आदी माहिती देण्यात आली नाही. सर्व जखमी विद्याथ्र्यावर जळगाव रस्त्यावरील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.विशेष म्हणजे दवाखान्यात दाखल केल्यानंतर विद्याथ्र्यानीच आपापल्या पालकांना झालेली घटना कळविली. त्यानंतर पालकांची दवाखान्यात मोठय़ा प्रमाणात गर्दी उसळली होती. जखमी विद्याथ्र्याना विचारले असता गाडी सुरू असताना चालक गाडीचा काच पुसत होता. त्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येते. संबंधित वाहनामध्ये प्रथमोपचाराचे कोणतेही साहित्य दिसून आलेले नाही. यापूर्वीही लार्ड गणेशा स्कूल बसला अपघात होऊन अनेक विद्यार्थी त्यावेळी गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा सर्वात मोठय़ा अशा जैन इंटरनॅशनल स्कूल बसचा हा दुसरा अपघात झाला आहे. याबाबत अद्यापही पोलीस ठाण्यात घटनेची नोंद नाही. (वार्ताहर) घटना घडताच चालकाने माहिती दिली. लागलीच उपप्राचार्य, लिपीक, शिक्षक आदींना दवाखान्यात पाठविले. आम्ही सतत विद्याथ्र्याची काळजी घेत असतो. आमच्या जबाबदारीवर सर्व बालक विद्यार्थी आमच्या ताब्यात राहतात. आम्ही त्यांची जीवापाड काळजी नेहमीच घेत असतो.- फिरोजा खान, प्राचार्या, जैन इंटरनॅशनल स्कूल, जामनेर