शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्तीची परीक्षा २३ मे रोजी ; विद्यार्थ्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST

जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.आठवी) ही आता २३ मे रोजी होणार ...

जळगाव : पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.आठवी) ही आता २३ मे रोजी होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरण्‍याकरिता शाळांना दुसऱ्यांदा १० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्‍यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. त्यामुळे यंदा पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा होणार की नाही हा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शिक्षण विभागाने पत्र काढत, शिष्यवृत्ती परीक्षा ही २५ एप्रिलला होणार असल्याबाबत स्पष्ट केले होते व २१ मार्चपर्यंत आवेदनपत्र भरण्‍यास मुदत देण्‍यात आली होती. परंतु, आता परीक्षेच्या वेळापत्रकात शासनाकडून बदल करण्‍यात आला असून ही परीक्षा २३ मे रोजी घेण्‍यात येणार आहे.

अर्ज भरण्यास मुदतवाढ

परीक्षेला पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्‍यात आला आहे. परीक्षा आता २३ मे रोजी होणार असल्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्‍याची सुध्‍दा तारीख वाढवून देण्‍यात आली आहे. त्यानुसार १० एप्रिलपर्यंत शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदनपत्र भरता येईल. ज्यांनी आवेदनपत्र भरले नाहीत, त्यांनी मुदतीत भरून घेण्‍याचे आवाहन शिक्षण विभागाच्यावतीने करण्‍यात आले आहे.

असा करावा अर्ज

डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपुणे डॉट इन आणि डब्लूडब्लूडब्लू डॉट एमएससीईपीयूपीपीएसएस डॉट इन या वेबसाईटवर वेळापत्रक, माहितीपुस्तिका आणि अर्ज उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती यावर देण्‍यात आली आहे.