शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महाविद्यालयात अडकले १७ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मार्च महिना संपण्यासाठी नऊ दिवस शिल्लक असताना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मार्च महिना संपण्यासाठी नऊ दिवस शिल्लक असताना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षातील जिल्ह्यातील १७ हजार ६१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप महाविद्यालयांमध्ये अडकले आहेत. अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार तरी केव्हा, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज मंजुरीसाठी पाठविण्‍यात यावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाकडून करण्‍यात आले आहे.

केंद्र शासनाच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अनुसूचित जाती, इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग इत्यादी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. त्यानुषंगाने शिष्यवृत्ती योजनेंतर्गत २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्तीसाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु मार्च एण्डिंग केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, जिल्ह्यातील ३३८ महाविद्यालयांकडून १७ हजार ६१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज अद्याप समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही.

विद्यार्थ्यांचे असे आहेत प्रलंबित अर्ज!

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३३८ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ६१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे दोन हजार ६२० अर्ज आणि इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील १४ हजार ४४१ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित आहेत.

एकूण ४९ हजार ४८२ अर्ज

३३८ महाविद्यालयातील हजार ४८२ विद्यार्थ्यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज केले आहेत. त्यापैकी २५ हजार ४०३ अर्जांना महाविद्यालयाकडून मान्यता देऊन सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या लॉगिनला पाठविण्‍यात आले आहे. या सर्व अर्जांना सहाय्यक आयुक्तांनी मंजुरी देऊन शासनाकडे पाठविले आहे. त्यानुसार १७ हजार ३९१ विद्यार्थ्यांच्या खात्यावर एकूण ११ कोटी ९१ लाख ६७ हजार ५९० रुपयांची शिष्यवृत्ती जमा झाली आहे. दरम्यान, ७४ अर्ज रिजेक्ट करण्‍यात आलेले आहेत.

उशिरा योजनेला सुरुवात

कोरोनामुळे ही योजना तब्बल सहा महिने उशिरा झाली. ३ डिसेंबरला प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात झाली. नंतर महाविद्यालयसुद्धा उशिराने सुरू झाली. कोरोनामुळे कर्मचाऱ्यांची पन्नास टक्के उपस्थिती, त्यामुळे ही पेंडन्सी असून, लवकरात लवकर संपूर्ण मंजूर केले जातील. त्यासाठी महाविद्यालयांनी तात्काळ अर्ज पाठवावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाकडून करण्‍यात आले आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालये- ३३८

अनुसूचित जाती प्रवर्ग- २,६२० (प्रलंबित)

इतर मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी), विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग- १४,४४१