शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर तालुक्यात टंचाईची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 21:34 IST

अमळनेर : आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतरदेखील तालुक्यातील २७ गावांना अद्याप पाणी टंचाई जाणवत आहे. ९ गावांना ६ टँकरने पाणी ...

अमळनेर : आॅगस्ट महिना सुरू झाल्यानंतरदेखील तालुक्यातील २७ गावांना अद्याप पाणी टंचाई जाणवत आहे. ९ गावांना ६ टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर १८ गावांना २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.गेल्या चार वर्षांपासून सतत दुष्काळी असलेल्या अमळनेर तालुक्याला पाऊस होऊन देखील आद्यप टंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यात सरासरी वार्षिक ५८२ मिमी पाऊस अपेक्षित आहे. जुलै अखेरपर्यंत ५० टक्के २९१ मिमी पाऊस पडायला हवा होता. मात्र, फक्त २४१.७३ मिमी पाऊस पडला आहे. जून महिन्यात ५६ गावांना टंचाई होती. त्यापैकी सध्या गडखांब, मांजर्डी, धुपी, कचरे, नांद्री, नगाव बुद्रूक, हेडावे, सुंदरपट्टी, पिंपळी या ९ गावांना ६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. १ शासकीय तर ५ खासगी टँकरद्वारे हा पुरवठा केला जात आहे. तसेच दहिवद खुर्द, सोनखेडी, मेहेरगाव, टाकरखेडा, पिंगळवाडे, रामेश्वर बुद्रूक, रामेश्वर खुर्द, खवशी, अंतुर्ली - रंजाने, जुनोने, तासखेडा, म्हसले, लोणे, दहिवद बुद्रूक, हिंगोने बुद्रूक, हिंगोने खुर्द, सावखेडा आदी १८ गावांना २१ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. तापी नदीला पूर आल्याने तापी काठावरील गावांचा प्रश्न मिटणार आहे. मात्र अद्याप बोरी व पांझराला पुरेसे पाणी आले नसल्याने टंचाई जाणवत आहे.सावखेडा व धावडे येथून टँकर भरले जात असून टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा केला जात आहे.-अजय नष्टे, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेरतालुक्यातील टंचाईचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. त्याप्रमाणे टँकरची मुदत आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.- संदीप वायाळ, सहाययक गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर