सातगाव डोंगरी हे खान्देश आणि मराठवाड्याच्या हद्दीवर वसलेले आहे. सातगाव व सार्वे-पिंप्री येथील मध्यम प्रकल्प गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने ओव्हरफ्लो झाल्याने शेतकरीराजा सुखावला आहे. ही दोन्ही धरणे अनेक गावांची तहान भागवत असून, कृषी क्षेत्रालाही या दोन्ही धरणांचा खूप मोठा फायदा होत असतो. यामुळे असंख्य शेतकऱ्यांना रबी पिकाची पेरणी उत्पादन घेता येते. त्यामुळे शेतकरी आनंदी झाला आहे.
या परिसराचे वैभव म्हणजे येथून तीन-चार किलोमीटरवर असलेला अजिंठा पर्वत. या अजिंठा पर्वताच्या रांगेमुळे पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी होते. ही दोन्ही धरणे तुडुंब भरल्याने सातगाव, तांडा, गहुले, सार्वे, पिंप्री, वाडी, शेवाळे, निंभोरी, शिंदाड आदी गावांना या धरणांचा कमी-जास्त प्रमाणात फायदा होत असतो. म्हणून ही दोन्ही धरणे भरल्याने परिसरातील शेतकरी आनंदित होत असतात. सातगाव येथील धरणात अनेक वर्षांपासून गाळ जमा झाल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. येणाऱ्या उन्हाळ्यात शासनाने संबंधित खात्याला आदेश देऊन शेतकऱ्यांना गाळ काढणे कामी मोफत जेसीबी मशीन पुरवून सवलत द्यावी जेणेकरून धरणातील गाळ काढून खोली तयार होईल आणि पाण्याची साठवण क्षमता वाढेल, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
040921\04jal_15_04092021_12.jpg
सातगाव, पिंप्री प्रकल्प ओवरफ्लो बळीराजा सुखावला