शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक होता आल्याने जन्म लागला सार्थकी : डॉ.विजया वाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 15:24 IST

आज माझे विद्यार्थी मराठी माध्यमात शिकूनदेखील जगात इतकी प्रगती करू शकले याचा अभिमान वाटतो.

ठळक मुद्देबाल साहित्याबरोबरच स्वानुभव कथनाने श्रोते झाले तृप्तआॅनलाईन संवाद सत्र : दुसऱ्या टप्प्यातील तिसरे सत्र

भुसावळ, जि.जळगाव : प्रत्येक मूल आपले प्रगतीपुस्तक आनंदाने घरी घेऊन जाईल; त्यासाठी शेवटच्या मुलापर्यंत शिक्षण देणे हेच ध्येय आयुष्यभर ठेवले. आज माझे विद्यार्थी मराठी माध्यमात शिकूनदेखील जगात इतकी प्रगती करू शकले याचा अभिमान वाटतो. शिक्षक होता आल्याने जन्म सार्थकी लागला, असे मत दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील ‘बालसाहित्यिका : गिरिजा कीर’ या पाठाच्या लेखिका डॉ.विजया वाड यांनी मांडले.जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन संवाद सत्राच्या दुसºया टप्प्यातील तिसºया सत्रात डॉ.वाड बोलत होत्या.प्रास्ताविक, सूत्रसंचालन व नियोजन मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी केले. शैलेंद्र महाजन यांनी डॉ.वाड यांचा परिचय करून दिला. बलवाडी, ता.रावेर येथील विद्यार्थिनी तेजस्विनी चौधरी हिने आभार मानले.डॉ. वाड आपल्या मनोगतात म्हणाल्या की, मुले शिक्षकांवर मनापासून अकृत्रिम प्रेम करतात. जीवनाचे नवे नवे धडे मुले शिकवतात. मी स्वत: अकरावीपर्यंत मराठी माध्यमात शिकले असून आठवीत इंग्रजीला बाळासाहेबांच्या कृपेने सुरूवात झाली होती. तरीसुद्धा भाषा शिकता येत असल्याने आज चौदा देशात अस्खलित इंग्रजी व्याख्याने दिली. मराठी माध्यमाची मुले कुठेही कमी पडत नाहीत, याचा खूप खूप अभिमान वाटतो. यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाची बीजे शिक्षकांनीच पेरायची असतात. कुठे जन्म घेतला याला महत्त्व नाही तर तुम्ही तुमच्या पराक्रमाने मोठे होणार आहात, हे विद्यार्थ्यांना ठासून सांगायला हवे. मी खूप बालसाहित्य लिहिले, विश्वकोशाचेदेखील काम केले, त्यातूनही आनंद मिळाला.बालसाहित्यिका गिरिजा कीर आवडत्या लेखिका असल्याचे डॉ. वाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तब्बल तासभर डॉ. वाड यांनी आपल्या लेखन व अनुभवाचा प्रवास आपल्या अमोघ वाणीतून मांडला. त्यामुळे कान तृप्त झाल्याच्या प्रतिक्रिया श्रोत्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :literatureसाहित्यBhusawalभुसावळ