शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

पहूरचे सपोनि शिरसाट यांची मुख्यालयात बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 16:49 IST

 अवैध धंद्यांची घेतली वरिष्ठांनी दखल

पहूर ता जामनेर :- पहूर हद्दीतील अवैधधंद्यानी डोके वर काढले असून त्या विरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलीसांची सुरक्षाच धोक्यात आल्याचे रविवारच्या घटनेवरून समोर आले. त्यामुळे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांची मुख्यालयात तडकाफडकी बदली केल्याचा चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांचा आदेश पहूर पोलीस स्टेशनला सोमवारी प्राप्त झाला आहे.पहूर हद्दीत अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. पोलिसांची कारवाई कागदोपत्री असल्याने या धंद्याना अभय मिळत असल्याचे दिसून येत आहे. गावा गावात हातभट्टया सुरू आहेत. याविरुद्ध धडक मोहीम पोलिसांनी राबविली पण सातत्य नसल्याने पुन्हा दारू विक्री सुरू आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कान उघडणीनंतर पोलीसांनी दिखाव्यापुरतीच दारु अड्डयांवर कारवाई केली आहे. दरम्यान काही दिवसातच दोन ते तीन खुनाच्या घटना घडल्या असून वाकडी प्रकरणात पोलिस आजही संशयाच्या भोवºयात आहेत. घरफोड्या नित्याच्याच झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सांगवी गावात शुल्लक कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांनी योग्य वेळी कारवाई केली नाही त्यामुळे संतप्त जमावाने एका पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीसस्टेशन मध्ये कॉलर धरली होती. तर एका प्रकरणात पोलीस स्टेशनवर दगडफेकीचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे अवैध धंद्याविरुद्ध निवेदन देणाºया युवकावर झालेला चाकू हल्ला झाला. याच बरोबर वाहतूकीचा बोजवारा उडाला असून वाहतूक पोलीस शोपीस ठरत आहे. एकीकडे पोलिसांची सुरक्षा धोक्यात आल्याने नागरीकांच्या सुरक्षेचे काय ? असा प्रश्न सर्व घटनांवरून समोर आला आहे. याविषयी सर्व सामान्य नागरीकांध्ये संतप्त भावना व्यक्त होत केल्या जात असून सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे.त्यामुळे साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाट यांची पोलीस मुख्यात बदली केली असल्याची चर्चा आहे. तर शिरसाट हे गेल्या दोन दिवसांपासून सुटीवर गेले आहेत. घटनेच्या दिवशी त्यांची रजा होती.जुगाराच्या घटनेत वाढीव कलमेपेठ गावातील बडा मोहल्ह्यात एलसीबीने कारवाई केल्यानंतर पोलीस कर्मचारी विजय पाटील यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी तलवार जप्त केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा मोहसीन पूर्ण नाव नाही. यांच्यासह संबंधित पाच जणांविरुद्ध व तलवार प्रकरणी माजी उपसरपं यांचा भाऊ ऐनद्दीन समसोद्दीनयांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व भारतीय हत्यार कायदा, दंगल , शिविगाळ अशी वाढीव कलमे लावण्यात आली आहे. यात इतर काही महिला व पुरूषांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.प्रतिक्रिया.....बडा मोहल्ला येथे घडलेल्या रविवारी च्या घटनेत पाच जणांना अटक करण्यात आली असून तलवार प्रकरणी एका जणाविरूध्द कारवाई करण्यात आली आहे. तलवार पोलिसांनी जप्त केली आहे. संबधिताविरूध्द वाढीव कलमे लावण्यात आली आहे.-रवींद्र बागुल, प्रभारी साहाय्यक पोलीस निरीक्षक, पहूर पोलिस स्टेशन