शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारत योजना नागरिकांकरिता ठरतेय संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 17:53 IST

पारोळा : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख ...

पारोळा : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निश्चित केलेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रतिवर्षी प्रतिकुटुंब आरोग्यासाठी पाच लाख रुपये विमा संरक्षण दिले जाणार आहे.या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना ठरावीक आजारासाठी देशभरातील कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील. या योजनेमध्ये सुमारे एक हजार १२२ आजारांचा समावेश आहे. यासाठी लाभार्थी कुटुंबांना ई-कार्ड देण्यात येणार आहेत.पारोळा शहरातील ४ हजार १७८ व ग्रामीण भागातील १७ हजार ४१२ कुटुंबांना याचा लाभ होणार आह. यामध्ये लाभार्थ्यांना कुटुंब प्रमुखाच्या नावाने पंतप्रधानांचे साक्षांकित पत्र आशा स्वयंसेविका यांच्यामार्फत यापूर्वीच वाटप करण्यात आले आहेत. ज्यांना हे पत्र मिळाले आहे अशा लाभार्थ्यांनी कॉमन सर्व्हिस सेंटर (सेतू सुविधा केंद्र) वर जाऊन हे कार्ड तयार करून घ्यावे. या पत्रासोबत रेशन कार्ड, आधार कार्ड अथवा ते नसल्यास मतदान कार्ड घेऊन नजीकच्या सेतू सुविधा केंद्रावर जाऊन हे कार्ड तयार करून घ्यावे. कार्ड काढण्याची शासकीय फी फक्त तीस रुपये आहे. कुणीही यापेक्षा जास्त शुल्क दऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.तुषार मोरे यांच्यातर्फे करण्यात येत आहे.योजना कोणासाठी...ग्रामीण भागातील अनुसूचित जाती-जमातीे, दारिद्रयरेषेखालील कुटुंब, भूमिहीन, दिव्यांग, अतिकष्टाचे काम करणारे कुटुंब, एका खोलीत कच्च्या घरात राहणारे, महिला कुटुंबप्रमुख असलेले यांचा समावेश आहे.शहरी भागातील कचरावेचक कुटुंब, भिक्षा मागणारे, रस्त्यावर विक्री करणारे, बांधकाम, रंगकाम कारागीर, प्लम्बर, गवंडी, वेल्डर, गटई कामगार, फेरीवाले, सफाई कामगार, हस्तकला कारागीर, शिंपी, वाहतूक कर्मचारी, चालक, वाहक व सायकलरिक्षा ओढणारे, दुकान कामगार, शिपाई, अटेंडंट, वेटर, मेकॅनिक, वीजतंत्री, धोबी, चौकीदार आदी कुटुंबांना पात्र ठरवण्यात आले आहे.