शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळ शेतकी संघाच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांना धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 15:59 IST

एक मत फुटल्याने माजी आमदार संतोष चौधरी गटाचे पंढरीनाथ पाटील चेअरमनपदी

ठळक मुद्देभाजपाचे आमदार संजय सावकारे यांच्या शेतकरी पॅनलकडे होते बहुमतभाजपाचा एक संचालक फुटल्याने सत्ता माजी आमदार संतोष चौधरी गटाकडेगुप्त मतदानानंतर अवघ्या एक मताने भाजपा उमेदवारांचा पराभव

आॅनलाईन लोकमतभुसावळ,दि.१२ : तालुका शेतकी संघाच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या सहकार पॅनलकडे बहुमत असतानाही एक मत फुटले. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार संतोष चौधरी गटाचे पंढरीनाथ तुकाराम पाटील (कन्हाळा, ता.भुसावळ) हे चेअरमन तर गोविंदा तुकाराम ढोले (मनूर, ता.बोदवड) हे व्हा.चेअरमनपदी निवडून आले.तालुका शेतकी संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांच्या सहकार गटाला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला सात जागा मिळाल्या होत्या.सोमवारी दुपारी चेअरमन व व्हा.चेअरमन निवडीसाठी संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात चौधरी गटाचे पंढरीनाथ तुकाराम पाटील व व्हा.चेअरमन पदाचे उमेदवार गोविंदा तुकाराम ढोले यांना प्रत्येकी ८ मते मिळाली आहे तर आमदार सावकारे गटाचे चेअरमनपदाचे उमेदवार अनिल पंडित पाटील व व्हा. चेअरमनपदाचे उमेदवार प्रशांत निकम यांना प्रत्येकी ७ मते मिळाली आहे. अवघ्या एका मताने आमदार सावकारे गटाच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. भाजपला हा धक्का मानला जात आहे. चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने झाली.यात सावकारे यांच्या गटाचा एक संचालक चौधरी यांच्या गटाला जाऊन मिळाल्याने त्यांना सहज विजय मिळविता आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक आर.आर. पाटील व साहाय्यक म्हणून आऱ पी़ निकाळे यांनी काम पाहिले.नवनिर्वाचितांचा सत्कारनिवड जाहीर होताच माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. रवींद्र पाटील, कृउबाचे सभापती सोपान भारंबे, सचिन चौधरी, पं.स.चे माजी सभापती राजेंद्र चौधरी आदींनी शेतकी संघ कार्यालयात जाऊन नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांचा सत्कार केला. या वेळी चौधरी यांनी शेतकी संघाची भरभराट होईल, असे आश्वासन दिले तर काही लोकांनी निवडणूक लादण्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBhusawalभुसावळ